INDvsAUS : स्मिथची पाचव्यांदा भारताविरुद्ध 'झटपट' शतकी खेळी
कोरोनाच्या कालखंडानंतर भारतीय संघ ऑस्टेलियासोबतच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरवात करत आहे.
कोरोनाच्या कालखंडानंतर भारतीय संघ ऑस्टेलियासोबतच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरवात करत आहे. भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्टेलियाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
विराटसोबत खेळताना फ्लॉप ठरलेल्या फिंचचा हिट शो!
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने फलंदाजी करताना वेगवान डाव खेळ करत टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे. स्टीव्ह स्मिथने केलेले वनडे कारकिर्दीतील हे दहावे शतक आहे. आपल्या कारकीर्दीतील 126 व्या वनडे सामन्यात त्याने दहावे शतक झळकावले. स्मिथचे भारताविरुद्धचे हे चौथे एकदिवसीय शतक होते. कर्णधार फिंचनंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टीव्ह स्मिथनेही शतक झळकावले.
स्टीव्ह स्मिथने भारतासोबतच्या आजच्या सामन्यात 62 चेंडूत शतक पूर्ण केले.या दरम्यान स्टीव्ह स्मिथने 10 चौकार आणि 4 जबरदस्त षटकार लगावले. तर आज फलंदाजी करताना स्मिथने 66 चेंडूत 105 धावा केल्या. आणि यावेळेस त्याने 11 चौकार आणि 4 षटकार ठोकले. स्मिथने केलेल्या या दमदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 50 षटकांत 6 गडी बाद 374 धावा केल्या. स्मिथने केलेली आजची खेळी ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक आहे.
मायदेशी परतला, तेव्हाच रोहितचा दौरा हुकला?
याशिवाय, ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा स्मिथ हा तिसरा खेळाडू ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ग्लेन मॅक्सवेलने झळकावले होते. त्याने 51 चेंडूत शतक झळकावले होते. तर जेम्स फॉल्कनरने 57 चेंडूत शतक झळकावले होते. त्यानंतर आता स्मिथने 62 चेंडूत शतक पूर्ण केले.
Australia finish on a mammoth 374/6
Aaron Finch 114
Steve Smith 105What a performance from the hosts!
Follow #AUSvIND https://t.co/CJnCSbUTV6 pic.twitter.com/NGNLSb9r3c
— ICC (@ICC) November 27, 2020
यानंतर, स्मिथने भारताविरूद्ध सर्वात जलद 5 वे शतक ठोकले. एकदिवसीय प्रकारात भारताविरूद्ध सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने 45 चेंडूत ही कामगिरी केलेली आहे. त्यानंतर जेम्स फॉल्कनर दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 57 चेंडूत शतक केले होते. आणि त्याच्या नंतर एबी डिव्हिलियर्सने अनुक्रमे 57 आणि 58 चेंडूत शतक करून तिसरे स्थान आणि चौथे स्थान राखले आहे.