अश्विनविरुद्ध केलेल्या स्ट्रॅटर्जीचा फायदा झाला - स्टीव्ह स्मिथ

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने दमदार खेळी करत शतक झळकावले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने दमदार खेळी करत शतक झळकावले. तर यापूर्वीच्या ऍडिलेड मध्ये पहिल्या कसोटीत आणि मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ अपयशी ठरला होता. मात्र सिडनीत होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने धमाकेदार पुनरागमन करत कसोटी कारकिर्दीतील 27 वे शतक लगावले. या खेळीनंतर स्टीव्ह स्मिथने भारतीय फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजी समोर अधिक गतीने फुटवर्क केल्याचा फायदा झाल्याचे म्हटले आहे. 

AUSvsIND : फक्त एक विकेट दूर; सर जडेजाच्या नावावर होणार अनोखा विक्रम

स्टीव्ह स्मिथ चार कसोटी सामन्यांच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये फक्त दहा धावा करू शकला होता. मात्र त्यानंतर त्याने सिडनीतील कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 131 धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथने केलेल्या या खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथने आपल्या खेळीच्या संदर्भात बोलताना, सकारात्मक राहिल्याचा फायदा झाल्याचे सांगितले. याशिवाय फलंदाजीला उतरल्यावर सुरवातीचे काही फटके आर अश्विनच्या डोक्यावरून मारून त्याच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे स्टीव्ह स्मिथने सांगितले. आणि यासाठी बराच वेळ वाट पाहायला लागल्याचा खुलासा देखील स्मिथने यावेळेस केला. 

याशिवाय, आर अश्विनच्या गोलंदाजी समोर ज्याप्रकारे खेळ करता आला त्यामुळे आनंदित असल्याचे स्टीव्ह स्मिथने सांगितले. सुरवातीला थोडी आक्रमक खेळी करून नंतर लय मिळाल्यानेच शतकीय खेळी करता आल्याचे स्टीव्ह स्मिथ पुढे म्हणाला. तसेच गरज पडेल त्यावेळेस दबावात खेळावे लागते आणि गरजेच्या वेळी दबाव बनवणे देखील आवश्यक असते. व तिसऱ्या कसोटी सामन्यात नेमके हेच केल्याचे स्टीव्ह स्मिथने सांगितले. 

ग्रेग चॅपेल यांच्या एक्सायटिंग टेस्ट टीम मध्ये फक्त दोनच भारतीय; दिग्गजांना...

दरम्यान, पहिल्या डावात 226 चेंडूंचा सामना करताना स्टीव्ह स्मिथने 131 धावा केल्या. यावेळेस त्याने 16 चौकार खेचले. मात्र त्यानंतर स्टीव्ह स्मिथला रवींद्र जडेजाने अफलातून थ्रो करत धावबाद केले. स्टीव्ह स्मिथ शिवाय लबूशेन आणि विल पुकोव्हस्की यांनी देखील पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. लबूशेनचे थोडक्यात शतक हुकले. लबूशेन 91 धावांवर बाद झाला. त्याला रवींद्र जडेजाने अजिंक्य रहाणे करवी झेलबाद केले. तर विल पुकोव्हस्कीला 62 धावांवर नवदीप सैनीने पायचीत केले.                


​ ​

संबंधित बातम्या