AUSvsIND: वसीम जाफरचे कोड लँग्वेज मधील ट्विट होतंय जाम व्हायरल 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 25 December 2020

मेलबर्नच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी एक दिवस बाकी असताना टीम इंडियाने आपल्या प्लेयिंग इलेव्हन संघाची घोषणा केली. व त्यासोबतच पहिल्या कसोटीच्या सामन्यातील टीम इंडियाची तुलना केल्यास दुसऱ्या सामन्यात संघात चार बदल करण्यात आले आहेत.

मेलबर्नच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी एक दिवस बाकी असताना टीम इंडियाने आपल्या प्लेयिंग इलेव्हन संघाची घोषणा केली. व त्यासोबतच पहिल्या कसोटीच्या सामन्यातील टीम इंडियाची तुलना केल्यास दुसऱ्या सामन्यात संघात चार बदल करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म असलेल्या पृथ्वी शॉच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आलेली आहे. तर दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या मोहम्मद सिराज कसोटी पदार्पण करणार आहे. त्यानंतर वृद्धिमान साहा आणि विराट कोहलीच्या जागी अनुक्रमे रिषभ पंत व रवींद्र जडेजा मैदानात उतरणार आहेत. 

'बॉक्सिंग डे' सामना म्हणजे काय ? घ्या जाणून 

भारतीय संघात दुसऱ्या कसोटीसाठी झालेल्या बदलांवर सोशल मीडियावरील युझर्सने चांगल्याच कमेंट्स केलेल्या आहेत. नेटिझन्स यांनी सोशल मीडियाच्या ट्विटर वर भारतीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी केएल राहुलला प्लेयिंग इलेव्हन मध्ये संधी न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला असल्याने त्याच्या जागी केएल राहुलला कसोटीत संधी मिळण्याची अपेक्षा चाहत्यांकडून केली जात होती. मात्र तसे न होता विकेटकिपर फलंदाज असलेल्या हनुमा विहारीला संघात कायम ठेवून पुन्हा साहाच्या जागी रिषभ पंतची निवड करण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजीसह प्रश्न देखील उपस्थित केला आहे. 

''टीम इंडियाच्या विकेटकिपिंग साठी संगीत खुर्ची'' 

भारतीय संघाच्या निवडीनंतर माजी कसोटीपटू असलेल्या वसीम जाफरने देखील ट्विटरवर सांकेतिक भाषेत नाराजी व्यक्त केली असल्याचे दिसत आहे. कारण  वसीम जाफरने आपल्या या ट्विट मध्ये New Opportunities Kindle Life असे लिहीत, या ट्विटसोबत आयसीसीने भारतीय संघाची प्लेयिंग इलेव्हन रिट्विट केलेली आहे. आणि त्यासोबतच जाफरने बॉक्सिंग डे व वुई बिलिव्हचा हॅश टॅग देखील वापरला आहे. त्यामुळे वसीम जाफरने लिहिलेल्या या चार शब्दातील पहिल्या अक्षरांचा विचार केल्यास तो NO KL असा होऊ शकतो. 

यानंतर अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने देखील सोशल मीडियाच्या ट्विटरवर भारतीय संघाच्या प्लेयिंग इलेव्हन बद्दल मत मांडले आहे. इरफान पठाणने शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजला कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यानंतर इरफानने प्लेयिंग इलेव्हन मध्ये केएल राहुलला पाहायला आवडले असते, असे नमूद केले आहे. 

तर, ऑस्ट्रेलियाच्या संघात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी स्पष्ट केले आहे. आणि या सामन्यात देखील जवळपास 30,000 क्रिकेट चाहते उपस्थित राहणार आहेत.             


​ ​

संबंधित बातम्या