ऑलिंपिकसाठी भारताच्या अठरा जागा निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

-  पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकसाठी भारताने आतापर्यंत 18 जागा मिळविल्या आहेत. यामध्ये तिरंदाजी, ऍथलेटिक्‍स, नेमबाजी, कुस्ती या खेळांचा समावेश आहे.

- आतापर्यंत ऑलिंपिकसाठी सर्वाधिक नऊ प्रवेश नेमबाजांनी निश्‍चित केले आहेत.

नवी दिल्ली -  पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकसाठी भारताने आतापर्यंत 18 जागा मिळविल्या आहेत. यामध्ये तिरंदाजी, ऍथलेटिक्‍स, नेमबाजी, कुस्ती या खेळांचा समावेश आहे. 
पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिकसाठी भारताला अजून काही प्रवेश मिळण्याची शक्‍यता आहे. यामध्ये हॉकी आणि बॅडमिंटन या प्रमुख खेळांचा समावेश असेल. ऍथलेटिक्‍स आणि कुस्तीमधीलही आणखी प्रवेश वाढण्याची शक्‍यता आहे. 
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता. भारतीय खेळाडू त्यादृष्टीने प्रयत्न करीत असले, तरी त्यांची मजल केवळ ऑलिंपिक पात्रता मिळविण्यापर्यंतच राहते, असे आजपर्यंतचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे यापुढे पात्रतेबरोबरच ऑलिंपिक पदक मिळविण्याच्या उद्देशाने भारतीय खेळाडू खेळल्यास पदकांची संख्या वाढू शकेल, असा मतप्रवाह पुढे येत आहे. 
------------ 
यांनी मिळवली पात्रता 
आतापर्यंत ऑलिंपिकसाठी सर्वाधिक नऊ प्रवेश नेमबाजांनी निश्‍चित केले आहेत. यामध्ये दिव्यांश सिंग (10 मीटर रायफल), संजीव राजपूत (50 मीटर रायफल थ्री-पोझिशन), राही सरनोबत (25 मीटर पिस्तूल), सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा (10 मीटर एअर पिस्तूल), अंजुम मौदगल, अपूर्वी चंडेला (10 मीटर एअर रायफल), मनु भाकर, यशस्विनी सिंह (10 मीटर एअर पिस्तूल) यांचा समावेश आहे. कुस्तीमध्ये दीपक पूनिया (86 किलो), रवी कुमार (57 किलो), बजरंग पूनिया (65 किलो), विनोश फोगट (53 किलो), तिरंदाजीत तरुणदीप राय, अतानु दास, प्रवीण जाधव; ऍथलेटिक्‍समध्ये इरफान (20 किमी चालणे), मिश्र रिले संघ यांनी ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली आहे. 
.... 


​ ​

संबंधित बातम्या