विराटचे शतक, भारताचा तिसऱ्या सामन्यात 6 गडी राखून विजय; मालिकाही जिंकली

वृत्तसंस्था
Thursday, 15 August 2019

कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजवर 6 गड्यांनी मात केली. या विजयासह भारताने 03 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. विराट कोहलीने अखेरच्या सामन्यात नाबाद 114 तर श्रेयस अय्यरने 65 धावांची खेळी केली.

पोर्ट ऑफ स्पेन : कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजवर 6 गड्यांनी मात केली. या विजयासह भारताने 03 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. विराट कोहलीने अखेरच्या सामन्यात नाबाद 114 तर श्रेयस अय्यरने 65 धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजने दिलेल्या 240 धावांत रोखल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी 255 धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर शिखर धवन पंत हे एकाच षटकात एकामागे एक माघारी परतले. यानंतर मैदानात आलेल्या मुंबईकर श्रेयस अय्यरने शतकी भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयस आणि विराटने फटकेबाजी करत धावांचा ओघ सतत सुरु ठेवला. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 120 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यर 65 धावांवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने केदार जाधवच्या साथीने आपल्या 43 व्या शतकाची नोंद करत विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत एकदिवसीय मालिकेवर ताबा मिळवला.

विंडीजने प्रथम फलंदाजी करताना 240 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला आश्वासक सुरुवात करुन दिली. पावसामुळे 15 षटकांचा खेळ कमी करण्यात आला होता. तत्पूर्वी, ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. अखेरीस चहलने लुईसला माघारी धाडत विंडीजची जोडी फोडली. मात्र गेलने भारतीय गोलंदाजांचा सामना करत आक्रमक अर्धशतक झळकावलं.

खलिल अहमदने गेलला माघारी धाडत विंडीजला दुसरा धक्का दिला. यानंतर शिमरॉन हेटमायर, शाई होप यांना ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडलं. निकोलस पूरन आणि जेसन होल्डरने फटकेबाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला, मात्र ते देखील आपल्या संघाला मोठा टप्पा गाठून देऊ शकले नाहीत. भारताकडून खलिल अहमदने 03 तर शमीने २ तर आणि चहल आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.


​ ​

संबंधित बातम्या