भारताने डच्चू दिलेल्या अश्विनच्या कौंटीत चार विकेट 

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

नॉटिंगहॅम ः भारताच्या कसोटी संघातूनही वगळण्यात आलेला ऑफस्पिनर आर. आश्विन याने कौंटी क्रिकेट स्पर्धेत छाप पाडली. तो नॉटिंगहॅमशायरचे प्रतिनिधित्व करीत आहे.

ट्रेंटब्रीज मैदानावर केंटविरुद्ध अव्वल विभागीय सामन्यात त्याने 121 धावांत 4 विकेट घेतल्या. त्याने 32 षटके टाकली, ज्यातील 10 मेडन होती. त्याने तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जॉर्डन कॉक्‍स (22), प्रतिस्पर्धी कर्णधार सॅम बिलिंग्ज (4), सलामीवीर डॅनिएल बेल-ड्रमंड (45) आणि यष्टिरक्षक-फलंदाज ओली रॉबिन्सन (6) असे मोहरे गारद केले. सातव्या क्रमांकावरील डॅरेन स्टीव्हन्सने 88 धावा केल्या. आश्विन सर्वाधिक यशस्वी ठरला.

​ ​

संबंधित बातम्या