आशियाई एअरगन स्पर्धा : भारताचे सुवर्णयश कायम 

शैलेश नागवेकर
Saturday, 30 March 2019

 तोयोन तेपैई येथे सुरु असलेल्या आशिआई एअरगन अजिंक्‍यपद स्पर्धेत सरबज्योत सिंग आणि इशा सिंग यांनी आपापल्या गटात सुवर्णपदके जिंकली त्यामुळे भारताच्या खात्यात आत्तापर्यंत आठ सुवर्ण जमा झाली आहेत.

नवी दिल्ली : तोयोन तेपैई येथे सुरु असलेल्या आशिआई एअरगन अजिंक्‍यपद स्पर्धेत सरबज्योत सिंग आणि इशा सिंग यांनी आपापल्या गटात सुवर्णपदके जिंकली त्यामुळे भारताच्या खात्यात आत्तापर्यंत आठ सुवर्ण जमा झाली आहेत. 10 मीटर पिस्तुल प्रकारात सरबज्योत आणि इशा यांनी ही कामगिरी केली. 

सरबज्योत केवळ वैयक्तिक सुवर्णपदकावर थांबला नाही तर त्याने अर्जून चीमा आणि विजयवीर सिद्धू यांच्यासाथील ज्युनियर गटाच्या सांघिक सुवर्णपदकही जिंकले. भारताच्या नावावर आठ सुवर्ण, चार रौप्य आणि दोन ब्रॉंझपदके झळकली आहेत. स्पर्धेचे अजून दोन दिवस शिल्लक आहेत. 

सरबज्योतने पात्रता फेरीत 579 गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले त्यानंतर अंतिम फेरीत 237.8 गुणांची कमाई केली त्यावेळी त्याने कोरियाच्या किम वूजॉंगचा पराभु केला. किमला 236.6 गुण मिळवता आले. पुरुषांच्या या 10 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या विजयवीरल 217.5 गुणांसह ब्रॉंझपदक मिळवता आले. तर अर्जून चीमा चौथा आला. 

महिलांच्या विभागात इशानेही पात्रता फेरीत 576 अशी कामगिरी केली त्यानंतर अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवताना 240.1 असे गुण मिळवले. कोरियाच्या यून सेंगजुंगला 235.5 गुणांसह रौप्यपदक मिळाले. या प्रकारात हर्षदा निथवे आणि देवांशी धर्मा यांनीही अंतिम फेरी गाठली होती, परंतु यांना पाचव्या आणि आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु या तिघींनी मिळून सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले. कोरियाने सुवर्ण कामगिरी केली.  


​ ​

संबंधित बातम्या