सॅफ करंडक फुटबॉल भारतीय मुलींना विजेतेपद

वृत्तसंस्था
Tuesday, 15 October 2019

- भारतीय मुलींच्या संघाने 15 वर्षांखालील गटाच्या "सॅफ' अजिंक्‍यपद फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

- चालिमीथांग मैदानावर मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय मुलींनी नियोजित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर बांगलादेशाचा शूटआउटमध्ये 5-3 असा पराभव केला

थिम्पू (भूतान) - भारतीय मुलींच्या संघाने 15 वर्षांखालील गटाच्या "सॅफ' अजिंक्‍यपद फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. येथील चालिमीथांग मैदानावर मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय मुलींनी नियोजित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर बांगलादेशाचा शूटआउटमध्ये 5-3 असा पराभव केला. 
विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत मायदेशातील सामन्यात भारताला बांगलादेशाविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले असतानाच भूतानमध्ये झालेल्या "सॅफ' स्पर्धेत भारतीय मुलींनी बांगलादेशाच्या मुलींचा पराभव करून भारतीय फुटबॉल चाहत्यांचे दुःख हलके केले. 
संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या भारताच्या मुलींनी आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. त्याचवेळी बांगलादेशाला गोलरक्षक रुपना चामका हिच्या भक्कम बचावामुळे नियोजित वेळेत पराभव टाळणे शक्‍य झाले. बांगलादेशची पहिलीच पेनल्टी किक अडवून भारताने झकास सुरुवात केली आणि त्यानंतर प्रत्येक किक यशस्वी मारून विजय साकार केला. भारताची अखेरची यशस्वी किक कर्णधार शिल्की देवी हिने मारली. 


​ ​

संबंधित बातम्या