भारतीय कुमार फुटबॉलपटू एएफसी स्पर्धेसाठी पात्र

वृत्तसंस्था
Sunday, 22 September 2019

ताश्‍कंद - भारतीय कुमार खेळाडूंनी येथे सुरू असलेल्या 16 वर्षांखालील एएफसी स्पर्धेत अपराजित राहताना पुढील वर्षी होणाऱ्या 16 वर्षांखालील एएफसी अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. 
भारतीय कुमार संघाने रविवारी झालेल्या सामन्यात उझबेकिस्तान संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. या बरोबरीने ते स्पर्धेत अपराजित राहिले आणि "ब' गटात आघाडीवर राहिले. दोन विजय आणि एक बरोबरी अशी त्यांची कामगिरी राहिली. त्यांनी बहारिन, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान संघांना मागे टाकले. 

स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यांनी तुर्कमेनिस्तान संघाचा 5-0 असा धुव्वा उडविला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्यांनी याच फककाने बहारिनचा पराभव केला. रविवारी त्यांनी सिद्धार्थने 66व्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या जोरावर उझबेकिस्तानविरुद्ध आघाडी घेतली होती. मात्र, त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. सामन्याच्या 81व्या मिनिटाला रायन इस्लामोव याने उझबेकिस्तानला बरोबरी राखून दिली. 
स्पर्धेच्या नियमानुसार 11 गट विजेते आणि दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम चार संघ या एएफसी अंतिम स्पर्धेत खेळतात. पुढील स्पर्धा बहारिनला होणार असल्यामुळे त्यांना मुख्य स्पर्धेत थेट स्थान मिळाले. या मुख्य स्पर्धेतील चार अव्वल संघ 17 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई संयुक्त फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधीत्व करतील. 
-------------- 
भारताची नवव्यांदा पात्रता 
भारतीय कुमार संघाने नवव्यांदा मुख्य स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. यापूर्वी भारतीय संघ 1990, 1996, 2002, 2004, 2208, 2012, 2016 आणि 2018 मध्ये पात्र ठरले होते. 

​ ​

संबंधित बातम्या