World Cup 2019 : ..तर भारत डायरेक्ट फायनलला जाणार!

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील "दोनही दिवशी' वरुणराजाने तुफानी फलंदाजी केल्यास भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. स्पर्धेतील साखळी लढतीत राखीव दिवस नसला, तरी उपांत्य; तसेच अंतिम लढतीसाठी राखीव दिवस आहे. आता दोन्ही दिवस जोरदार पाऊस झाल्यास प्रतिस्पर्धी संघात साखळीत जास्त गुण असलेला संघ उपांत्य फेरीची लढत जिंकल्याचे जाहीर होईल

वर्ल्ड कप 2019 : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील "दोनही दिवशी' वरुणराजाने तुफानी फलंदाजी केल्यास भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. स्पर्धेतील साखळी लढतीत राखीव दिवस नसला, तरी उपांत्य; तसेच अंतिम लढतीसाठी राखीव दिवस आहे. आता दोन्ही दिवस जोरदार पाऊस झाल्यास प्रतिस्पर्धी संघात साखळीत जास्त गुण असलेला संघ उपांत्य फेरीची लढत जिंकल्याचे जाहीर होईल. 

आता लढत टाय झाल्यास सुपर ओव्हरद्वारे विजयी संघ ठरेल; पण लढतीच्या निश्‍चित दिवशी; तसेच राखीव दिवशी पावसाने खेळ न झाल्यास जास्त गुणांचा नियम अमलात येईल. याचबरोबर लढतीच्या निश्‍चित दिवशी पावसामुळे लढत अर्धवट राहिल्यास राखीव दिवशी त्याचस्थितीत लढत पुढे सुरू होईल. आता लढतच न झाल्यास साखळीत जास्त गुण असलेला संघ विजयी होईल. साखळीत भारताचे 15; तर न्यूझीलंडचे 11 गुण आहेत. 

...तर संयुक्त विजेते 

उपांत्य लढत पावसामुळे होऊच न शकल्यास गुणतक्ता निर्णायक ठरेल; पण अंतिम लढत पावसाने वाहून गेल्यास प्रतिस्पर्धी संघ संयुक्त विजेते होतील; मात्र लढत टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. 

काही सरींचा अंदाज 
ऍक्‍यूवेदरने भारत-न्यूझीलंड लढतीच्या "दोनही दिवशी' पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. लढतीच्या निश्‍चित दिवशी म्हणजेच मंगळवारी काळे ढग दिवसभर असतील; तसेच काही सरींची अपेक्षा आहे, त्यातील काही जोरदार असतील. बुधवारीही आकाश ढगाळलेले असेल, काही सरी अपेक्षित आहेत; पण त्या मंगळवारइतक्‍या जोरदार नसतील.


​ ​

संबंधित बातम्या