धावपटू हिमा दिसचा सुवर्ण चौकार
हिमा दासने चेक प्रजासत्ताक येथील टॅबोर येथे झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत आणखी एकदा अव्वल स्थान पटकावले. हिमाने 23.25 सेकंदाची वेळ नोंदवून 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नावावर केले. पण, तिची ही कामगिरी सर्वोत्तम (23.10 सेकंद) कामगिरीच्या जवळपासचीही नव्हती. भारताच्याच व्ही के विस्मयानं 23.43 सेकंदासह रौप्यपदक जिंकले.
नवी दिल्ली : भारताची धावपटू हिमा दास हिने आणखी एक सुवर्ण पदक पटकावत गेल्या पंधरा दिवसांत चौथे सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली आहे.
Won another gold today in 200m and improved my timings to 23.25s at Tabor GP. pic.twitter.com/mXwQI2W2BI
— Hima MON JAI (@HimaDas8) July 17, 2019
हिमा दासने चेक प्रजासत्ताक येथील टॅबोर येथे झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत आणखी एकदा अव्वल स्थान पटकावले. हिमाने 23.25 सेकंदाची वेळ नोंदवून 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नावावर केले. पण, तिची ही कामगिरी सर्वोत्तम (23.10 सेकंद) कामगिरीच्या जवळपासचीही नव्हती. भारताच्याच व्ही के विस्मयानं 23.43 सेकंदासह रौप्यपदक जिंकले.
आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमाने गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले आहे. नुकतेच पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमाने महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. नंतर तिने कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेत 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली. त्यात रविवारी हिमानं 23.43 सेकंदाच्या वेळेसह आणखी एक सुवर्णपदक नावावर केले. हिमाने आसाममधील पुरग्रस्तांना मदत करून दिलदारपणा दाखविला आहे.