इंडिया ओपन बॅडमिंटनबाबत असोसिएशनचा मोठा निर्णय; स्पर्धा होणार पण...
बॅडमिंटन चाहते लढतींचा आनंद सुरुवातीच्या दिवशी यू ट्यूबवर घेऊ शकतील. उपांत्यपूर्व फेरीपासून स्पर्धेचे हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण आहे.
मुंबई/नवी दिल्ली : इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसारच होईल, पण कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे ही स्पर्धा प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय भारतीय बॅडमिंटन संघटनेने घेतला आहे.
- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केंद्र सरकारने कोरोनाचा प्रसार झालेल्या देशांतील नागरिकांच्या भारत प्रवेशावर कठोर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार भारतात प्रवेश करण्यापूर्वी 14 दिवस विलगीकरण कक्षात थांबण्याची सक्ती आहे. त्यामुळे इंडिया ओपनबाबत प्रश्न असल्याचे सांगितले जात होते. मात्र ही स्पर्धा ठरल्यावेळेनुसारच म्हणजेच 24 मार्चपासून दिल्लीत होईल, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने सांगितले.
- IPL 2020 : मंदीचा फटका 'आयपीएल'लाही; बक्षिस रक्कम निम्म्यावर!
नवी दिल्लीत 24 ते 29 मार्चदरम्यान होणारी स्पर्धा पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसार होईल. या स्पर्धेतील सहभागी खेळाडू, पंच तसेच पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्यात येणार आहेत. त्यात प्रेक्षकांविना बंदिस्त दरवाजाआड स्पर्धा घेण्याचा पर्यायही खुला आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे. मात्र इंडिया ओपन इंदिरा गांधी बंदिस्त स्टेडियममध्ये होणार आहे.
- ऑल इंग्लंड बॅडमिंटन : साईना, श्रीकांतला अखेरची संधी?
या स्पर्धेच्या सुरळीत संयोजनासाठी आम्ही प्रेक्षकांना स्पर्धा ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव अजय के सिंघानिया यांनी सांगितले. बॅडमिंटन चाहते लढतींचा आनंद सुरुवातीच्या दिवशी यू ट्यूबवर घेऊ शकतील. उपांत्यपूर्व फेरीपासून स्पर्धेचे हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण आहे, असेही त्यांनी सांगितले.
- IPL 2020 : प्रेक्षकांविना आयपीएलला फ्रॅंचाईजचा कडवा विरोध?
कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे अनेक स्पर्धा रद्द होत आहेत. चायना मास्टर्स (25 फेब्रुवारी ते 1 मार्च), व्हिएतनाम चॅलेंज (24 ते 29 मार्च), जर्मन ओपन (3 ते 8 मार्च) आणि पोलिश ओपन (26 ते 29 मार्च) या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. स्विस ओपन स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहे.
- इतर बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा
. @Pvsindhu1- winner of the 2017 and runners up of the 2018 edition will aim for her second title this year as we celebrate the #DecadeofSamashes at #IndiaOpen. Follow us for all Updates.#badminton #BestofBadminton #IndiaOpen2020#Olympics#Tokyo2020 pic.twitter.com/dg2zGwDvwz
— BAI Media (@BAI_Media) March 11, 2020