सर्फराजसाठी टिकेबरोबर सहानुभूती देखील 

वृत्तसंस्था
Saturday, 22 June 2019

स्पर्धे दरम्यान एका मोकळ्या वेळात सर्फराज आपल्या मुलाबरोबर मॉलमध्ये खरेदी करायला गेला असता एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्याविषयी अपशब्द वापरले आणि अपयशाबद्दल त्याच्यावर मानहानीकारक टिप्पणीही केली.

लंडन : पाकिस्तान संघ विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशी कामगिरी चांगलाच टिकेचा धनी बनला आहे. त्यातही कर्णधार सर्फराजला अधिक लक्ष्य केले जात आहे.

स्पर्धे दरम्यान एका मोकळ्या वेळात सर्फराज आपल्या मुलाबरोबर मॉलमध्ये खरेदी करायला गेला असता एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्याविषयी अपशब्द वापरले आणि अपयशाबद्दल त्याच्यावर मानहानीकारक टिप्पणीही केली. त्याने या सगळ्याचे चित्रण केले आणि ट्‌विटरच्या माध्यमातून ते व्हायरल केले. मात्र, यात सर्फराजला अधिक सहानूभूती मिळाली. पाक संघाचे सच्चे चाहते, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, अन्य क्रिकेट चाहते यांनी समर्थकाच्या या कृत्याचा निषेध केला आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी रेहम खान यांनीही त्या समर्थकाचा समाचार घेतला आहे. "सर्फराजने केवळ एक सामना गमावला आहे, मात्र आपल्याच खेळाडूविषयी अशी भावना व्यक्त करून तुम्ही तर सभ्यताही गमावली आहे. आपले कोण, दुसरे कोण हेच तुम्हाला समजत नाही.'असे ट्‌विट करून रेहम खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या