World Cup 2019 : काल होते रेन रेन गो अवे... आज झाले येरे येरे पावसा..!
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला साखळी सामना असो वा उपांत्य फेरीचा दोनशे चाळीस धावांचे आव्हान तसे फारच नाहीच, केवळ सावध सुरुवात हवी होती, पण भारतीयांनी तीन खंदे फलंदाज पाच धावांत गमावल्यावर तमाम पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोसे जणू फारच संथ होऊ लागले होते.आता काय होणार मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभे राहिले होते.
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : होते रेन रेन गो अवे...आज झाले येरे येरे पावसा.. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला साखळी सामना असो वा उपांत्य फेरीचा दोनशे चाळीस धावांचे आव्हान तसे फारच नाहीच, केवळ सावध सुरुवात हवी होती, पण भारतीयांनी तीन खंदे फलंदाज पाच धावांत गमावल्यावर तमाम पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोसे जणू फारच संथ होऊ लागले होते.आता काय होणार मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभे राहिले होते.
आणि अचानक पाऊस आठवला! याच पावसाने काल मोठा व्यत्यय आणला. जणू सामनाच वाया जाण्याची शक्यता होती. काल ज्या पावलाला रेन रेन गो अवे अशी हाक मारली होती त्याच पावसासाठी आज येरे येरे पावसा अशी साद घातण्यात आली.
पण वीस षटकांचा खेळ झाल्यावर काहीच उपयोग राहिला नाही कारण एकदिवसीय सामन्याचा निकाल लागण्यासाठी वीस षटकांचा खेळ पुरेसा ठरतो.