अबब.. भारतीय संघात चार-चार विकेटकिपर्स

शैलेश नागवेकर
Tuesday, 2 July 2019

एक खेळाडू जो दोन भूमिका बजावू शकतो. पण या सामन्यात धोनीचा अपवाद सोडला तर इतर तिघे निव्वल फलंदाज म्हणून खेळत आहेत. त्यामुळे आता इतर तिघे अष्टपैलू वर्गात मोडणार नाहीत. अॅडम गिलख्रिस्ट, कुमार संगकारा असे निष्णांत यष्टीरक्षक निव्वळ फलंदाज म्हणूनही सर्वश्रेष्ठ होते. आत्ताच उदाहरण द्यायचे तर इंग्लंड संघात जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टॉ हे दोन यष्टीरक्षक फलंदाज खेळत आहे. बेरअस्टॉने तर गेल्या सामन्यात भारतीय संघाची धुलाई केली होती.

टीम इंडियाने केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम केला. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशविरुदधच्या सामन्यात एकाच संघाच तीन + एक असे एकूण चार यष्टीरक्षक खेळवले. महेंद्रसिंग धोनी, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक तिघे मुख्य यष्टीरक्षक आहेत तर के.एल. राहुल बदली यष्टीरक्षक. मुळात यष्टीरक्षक हा अष्टपैलू वर्गात मोडतो.

एक खेळाडू जो दोन भूमिका बजावू शकतो. पण या सामन्यात धोनीचा अपवाद सोडला तर इतर तिघे निव्वल फलंदाज म्हणून खेळत आहेत. त्यामुळे आता इतर तिघे अष्टपैलू वर्गात मोडणार नाहीत. अॅडम गिलख्रिस्ट, कुमार संगकारा असे निष्णांत यष्टीरक्षक निव्वळ फलंदाज म्हणूनही सर्वश्रेष्ठ होते. आत्ताच उदाहरण द्यायचे तर इंग्लंड संघात जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टॉ हे दोन यष्टीरक्षक फलंदाज खेळत आहे. बेरअस्टॉने तर गेल्या सामन्यात भारतीय संघाची धुलाई केली होती.

त्यामुळे दोन...तीन...चार यष्टीरक्षक खेळवण्यात काही गैर नाही, पण यातून तुमच्याकडे मधल्या फळीत निव्वल फलंदाज नसल्याचे स्पष्ट होते. फिरून फिरून पुन्हा दिनेश कार्तिक हा पर्याय पहावा लागत आहे. मुळात चौथ्या क्रमांकासाठी सर्व खेळ सुरु होता आता त्यात यष्टीरक्षक फलंदाजाची भर पडली आहे. 

केदार जाधवला वगळून दिनेश कार्तिकला स्थान देऊन भारताने फलंदाजीचा कदाचीत जास्त विचार केला असेल. पण संघात आता पाचच गोलंदाज आहेत. त्यामुळे एखाद्या गोलंदाजाची धुलाई झाली किंवा दूर्दैवाने दुखापत झाली तर सहावा गोलंदाज म्हणून विराट कोहलीला स्वतः गोलंदाजी करावी लागेल. निदहास करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध अवाक्याबाहेरचा विजय दिनेश कार्तिकने खेचून आणला होता. म्हणून कदाचीत कार्तिकला स्थान देऊन टीम इंडियाने गँग ऑफ विकेटकिपर्स तयारी केली असावी.

​ ​

संबंधित बातम्या