मनप्रीत, राणी हॉकी संघांचे कर्णधार

वृत्तसंस्था
Saturday, 19 October 2019

- मनप्रीतसिंग आणि राणी रामपाल ऑलिंपिक पात्रता हॉकी लढतीत भारतीय संघांचे नेतृत्व करतील.

- भारतीय पुरुष संघ रशियाविरुद्ध, तर महिला संघ अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे.

- या लढती 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्‍वरला होतील. 

मुंबई - मनप्रीतसिंग आणि राणी रामपाल ऑलिंपिक पात्रता हॉकी लढतीत भारतीय संघांचे नेतृत्व करतील. भारतीय पुरुष संघ रशियाविरुद्ध, तर महिला संघ अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या लढती 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्‍वरला होतील. 
ऑलिंपिक पात्रता लढत असल्यामुळे संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. इंग्लंड दौऱ्यावरील महिला संघ कायम ठेवण्यात आला आहे. "आम्ही समतोल संघ निवडला आहे आणि त्या वेळी विविध पर्याय खुले राहतील हा विचारही केला आहे. आता सर्व लक्ष रशियाविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वतयारीवर केंद्रित केले आहे,' असे पुरुष संघाचे मार्गदर्शक ग्रॅहम रिड यांनी सांगितले. 
आमचा संघ समतोल आहे. त्यात अनुभव तसेच तरुण खेळाडूंचा चांगला संगम आहे. ऑलिंपिक पात्रता लढत लक्षात घेऊनच संघ निवड केली आहे. सरावातील कामगिरीही निवडीच्या वेळी लक्षात घेतली, असे महिला संघाचे मार्गदर्शक शूअर्ड मरिन यांनी सांगितले. 

भारतीय संघ 
पुरुष ः पी. आर. श्रीजेश, कृष्णन बहादूर पाठक, हरमनप्रीतसिंग, वरुण कुमार, सुरेंदर कुमार, गुरिंदरसिंग, रुपिंदर पालसिंग, अमित रोहिदास, मनप्रीतसिंग (कर्णधार), नीलकांत शर्मा, हार्दिकसिंग, विवेक सागर प्रसाद, ललित कुमार उपाध्याय, एस. व्ही. सुनील (उपकर्णधार), मनदीपसिंग, आकाशदीपसिंग, रमणदीपसिंग, सिमरनजित सिंग. 
महिला ः सविता (उपकर्णधार), रजनी एतिमार्पू, दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना खोखर, सलीमा टेटे, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, राणी रामपाल (कर्णधार) लिलीमा मिंझ, नमिता टोप्पो, वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर, शर्मिला देवी. 
 


​ ​

संबंधित बातम्या