नेमबाज दीपक कुमारला ब्रॉंझसह ऑलिंपिकचे तिकीट
- भारताच्या दीपक कुमारने साधली. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ब्रॉंझपदकाची कमाई करताना ऑलिंपिक कोटादेखील मिळविला.
- ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला दीपक भारताचा दहावा नेमबाज ठरला.
दोहा - आशियाई नेमबाजी स्पर्धेद्वारे ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची संधी भारताच्या दीपक कुमारने साधली. त्याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ब्रॉंझपदकाची कमाई करताना ऑलिंपिक कोटादेखील मिळविला.
ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला दीपक भारताचा दहावा नेमबाज ठरला. दीपकने गेल्या वर्षी विश्वकरंडक स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविले होते. आज दीपकने पात्रता फेरीतून 626.8 गुणांसह आठ जणांच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम फेरीत त्याने प्रयत्नांची शिकस्त केली; पण त्याला 227.8 गुणांचाच वेध घेता आला. अर्थात, तो या कामगिरीसह ब्रॉंझपदकाचा मानकरी; तसेच ऑलिंपिकसाठी पात्र ठरला.
या स्पर्धेत भारताकडून तीन अनुभवी नेमबाज सहभागी झाले होते. यात दीपकने आपला अनुभव पणाला लावून अपेक्षा पूर्ण केल्या. या स्पर्धा प्रकारात ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला दीपक दुसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी दिव्यांश पन्वर याने ऑलिंपिक पात्रता सिद्ध केली आहे.
------------
भारताच्या ऑलिंपिक जागा
भारताने आतापर्यंत रायफल आणि पिस्तूल प्रकारातून नऊ ऑलिंपिक जागा मिळविल्या आहेत. आतापर्यंत चीनने सर्वाधिक 25, कोरियाने 12 जागा मिळविल्या आहेत. त्याचवेळी यजमान या नात्याने जपानला 12 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.