पाकच्या आसिफला हरवून लक्ष्मण रावत जगज्जेता

वृत्तसंस्था
Sunday, 22 September 2019

- भारताच्या लक्ष्मण रावतने पाकिस्तानच्या महंमद आसिफचे कडवे आव्हान 6-5 असे परतवले आणि जागतिक सिक्‍स रेड स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

-क्ष्मणने पंकज अडवाणीला हरवून अंतिम फेरी गाठली होती.

-आशियाई विजेत्या भारताच्या अमी कामानी हिला निर्णायक लढतीत थायलंडच्या नुचारत वांघाऊथुई हिच्याविरुद्ध 2-4 अशी हार पत्करावी लागली.

मुंबई - लक्ष्मण रावतने पाकिस्तानच्या महंमद आसिफचे कडवे आव्हान 6-5 असे परतवले आणि जागतिक सिक्‍स रेड स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लक्ष्मणने पंकज अडवाणीला हरवून अंतिम फेरी गाठली होती. महिलांच्या अंतिम लढतीत भारताच्या अमी कामानीला हार पत्करावी लागली. 
लक्ष्मणने अकरा फ्रेमच्या निर्णायक लढतीत सुरवातीस 5-1 भक्कम आघाडी घेतली होती. आसिफने त्यानंतर सलग चार फ्रेम जिंकत बरोबरी साधली. निर्णायक फ्रेममध्ये आसिफची सुरवात जबरदस्त होती; पण त्याच्याकडून निळा चेंडू जिंकताना चूक झाली. त्यामुळे लक्ष्मणला संधी मिळाली. त्याने निळा, गुलाबी आणि काळा चेंडू जिंकत फ्रेम; तसेच जागतिक विजेतेपद जिंकले. 
लक्ष्मणने निर्णायक लढतीत 21-46, 44-0, 51-18, 48-23, 38-2, 44-30, 6-32, 18-43, 8-55, 8-63, 21-19 असा विजय संपादला. सामन्यातील सर्वांत मोठा 41 गुणांचा ब्रेक आसिफने केला; पण लक्ष्मणने मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावला. 
आशियाई विजेत्या अमीला निर्णायक लढतीत थायलंडच्या नुचारत वांघाऊथुई हिच्याविरुद्ध 2-4 अशी हार पत्करावी लागली. अमीने दोनदा पिछाडीनंतर बरोबरी साधली; पण त्याची पुनरावृत्ती त्यानंतर तिला करता आली नाही. अमीने ही लढत 15-39, 32-17, 38-41, 35-27, 0-39, 19-37 अशी गमावली. 


​ ​

संबंधित बातम्या