बजरंग पुनिया होणार फोगटांचा जावई

वृत्तसंस्था
Friday, 9 August 2019

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया विवाहबंधनात अडकणार आहे. जागतिक पातळीवर तिरंगा फडकवणाऱ्या महिला कुस्तीपटू फोगट भगिनींपैकी संगीता फोगटशी त्याचे सूत जुळले आहे. ​

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया विवाहबंधनात अडकणार आहे. जागतिक पातळीवर तिरंगा फडकवणाऱ्या महिला कुस्तीपटू फोगट भगिनींपैकी संगीता फोगटशी त्याचे सूत जुळले आहे. 

2020 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकनंतर हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती दोन्ही कुटुंबीयांकडून प्रसारमाध्यमांना दिली आहे. बजरंग आणि आमचे कुटुंबीय एकमेकांना चांगले ओळखतात. मी मुलींच्या इच्छेबाहेर नाही, असे मत संगीताचे वडील महावीर फोगट यांनी व्यक्त केले असून संगीता आणि बजरंग यांच्या लग्नाला पाठिंबा दर्शविला आहे.   

महावीर म्हणाले की, संगीता सोनीपत येथे सराव करीत असून ती सध्या तिच्या खेळावर लक्ष केंद्रित करीत आहे. मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये माझ्या मुली व पुनियाकडून सुवर्ण पदकांची अपेक्षा करीत आहे.

झज्जरच्या खुदान या गावचा रहिवासी असलेल्या पुनियाने वयाच्या सातव्या वर्षी कुस्तीच्या रिंगात पाऊल ठेवले. सध्या बजरंग जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून 65 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. तर संगीता राष्ट्रीय पातळीवर 59 किलो वजनी गटात खेळते.


​ ​

संबंधित बातम्या