"आयओए'-"सीजीएफ' प्रमुखांची पुढील महिन्यात बैठक

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

-भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) मध्यक्ष नरिंदर बात्रा आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष ल्युसी मार्टिन 14 ऑक्‍टोबर रोजी भेटणार

- नेमबाजीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळल्याचाच प्रश्‍न ऐरणीवर

-भारताच्या बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने नेमबाजीला वगळल्याचा निर्णय मागे घेण्यास उशीर झाल्याची प्रतिक्रीया दिली होती.

नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) मध्यक्ष नरिंदर बात्रा आणि राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष ल्युसी मार्टिन 14 ऑक्‍टोबर रोजी भेटणार असून, त्यांच्यामध्ये नेमबाजीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळल्याचाच प्रश्‍न ऐरणीवर असेल, असे सांगण्यात येत आहे. 
लंडन येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून यमजानाचे अधिकार वापरून संयोजन समितीने नेमबाजीला वगळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्या भारताने थेट राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. यानंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने भारतीय ऑलिंपिक महासंघास चर्चेस येण्याची सूचना केली होती. ही बैठक दिल्ली येथेच होईल, असे बात्रा यांनी स्पष्ट केले आहे. मार्टिन यांच्याबरोबर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड ग्रीव्हेम्बर्ग बैठकीला उपस्थित राहणार आहेत. "आयओए'कडून बात्रा यांना सरचिटणीस राजीव मेहता साथ करणार आहेत. या भारत भेटीत मार्टिन केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांचीदेखील भेट घेणार अशल्याचे समजते. भारताच्या बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने नेमबाजीला वगळल्याचा निर्णय मागे घेण्यास उशीर झाल्याची प्रतिक्रीया दिली होती. त्यामुळे आता या दोन्ही महासंघांच्या अध्यक्षांच्या भेटीकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागून राहिल. 


​ ​

संबंधित बातम्या