IPL 2021 : निवृतीनंतरही धोनीचीच हवा; माही ठरला बिग बजेट 'खिलाडी'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 1 February 2021

IPL 2020 च्या हंगामापर्यंत महेंद्रसिंह धोनीने 137 कोटी रुपये कमावले होते. चेन्नईने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी त्याला करारबद्ध करता आता त्याच्या नावे 150 कोटींपेक्षा अधिक उत्पन्नाची नोंद झालीय.

युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जच्या संघावर चांगलीच नामुष्की ओढावली. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफच्या शर्यतीत दिसला नाही. संघाची कामगिरी निराशजनक झाली असतानाही चेन्नई फ्रँचायजीने धोनीवर विश्वास कायम ठेवत पुढील हंगामात संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाने धोनीला रिटेन केल्यानंतर त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या माध्यातून सर्वाधिक उत्पन्न मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.  

IPL 2020 च्या हंगामापर्यंत महेंद्रसिंह धोनीने 137 कोटी रुपये कमावले होते. चेन्नईने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी त्याला करारबद्ध करता आता त्याच्या नावे 150 कोटींपेक्षा अधिक उत्पन्नाची नोंद झालीय. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने त्याला 15 कोटीला करारबद्ध केले.  IPL च्या पहिल्या हंगामात चेन्नईने धोनीसाठी 6 कोटी रुपये मोजले होते. त्यावेळी धोनी सर्वाधिक महागडा खेळाडूही ठरला होता. पुढील तीन वर्षे याच रक्कमेवर तो चेन्नईकडून खेळला. 2011 ते 2013 च्या हंगामात त्याच्या करार वाढवण्यात आला. त्याला प्रत्येकी हंगामात  8.28  कोटींची रक्कम मिळाली. 2014 ते 2017 च्या हंगामात धोनीसाठी चेन्नईने 12.5 कोटी इतकी रक्कम मोजली. 

IPL 2021 : रिटेन होताच 360 डिग्री एबी ठरला मालामाल होणारा पहिला परदेशी खेळाडू

आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी अव्वलस्थानी आहे. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे रोहितचे मानधन हे विराटपेक्षा कमी आहे. पण आतापर्यंतच्या हंगामात मिळून विचार केल्यास रोहितची कमाई इधिक आहे. रोहित शर्माचं सध्याच्या घडीला मानधन 15 कोटी रुपयांच्या घरात आहे. आतापर्यंत त्याने  146.60 कोटींची कमाई केली आहे. राट कोहलीच मानधन रोहितच्या तुलनेत दोन कोटींनी अधिक म्हणजेच 17 कोटी आहे. पण आयपीएलमधील त्याची कमाई143.20 कोटी इतकी आहे. 

विराट कोहलीचा सहकारी आणि मिस्टर 360 अशी ओळख असणारा एकमेवर परदेशी खेळाडूची कमाई 100 कोटींच्या घरात आहे. धोनी, रोहित आणि विराच नंतर एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत येतो. 36 वर्षीय एबीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 11 कोटी रुपयांना रिटेन केले होते.  


​ ​

संबंधित बातम्या