कोरोनाच्या लढ्यासाठी कमिन्सकडून ५० हजार डॉलर

पीटीआय
Tuesday, 27 April 2021

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळणाऱ्या पॅट कमिन्सने भारतातील कोरोनाच्या लढ्यासाठी स्वतःचे ५० हजार डॉलर (सुमारे ३० लाख रुपये) पंतप्रधान केअर फंडला दिले आहे.

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळणाऱ्या पॅट कमिन्सने भारतातील कोरोनाच्या लढ्यासाठी स्वतःचे ५० हजार डॉलर (सुमारे ३० लाख रुपये) पंतप्रधान केअर फंडला दिले आहे.

कोरोना रुग्णांना रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी ही आपली मदत असल्याचे कमिन्सने जाहीर केले आहे. भारत हा देश माझ्यासाठी फार जवळचा आहे. येथील लोकही दयाळू आणि प्रेमळ असल्याचे मी अनुभवले आहे. यातील अनेक जण किंवा त्यांचे कोणी तरी नातेवाईक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या महामारीचा सामना करत आहेत, असे मत कमिन्सने ही मदत जाहीर करताना व्यक्त केले आहे.

तो पुढे म्हणला, कोरोनाचा संसर्ग कमालीचा वाढत असताना आयपीएल खेळणे किती उचित आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, परंतु या कठीण आणि लॉकडाऊनच्या काळात काही काळ तरी कोरोनाच्या भीतीतून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यास आयपीएल सामन्याने मदत होत आहे त्यामुळे भारत सरकारने आयपीएल बंद करू नये.

इतरांनीही मदत करावी
खेळाडू म्हणून आम्हाला क्षणार्धात लाखो-करोडोंपर्यंत जाण्याची संधी मिळते, प्रसिद्धीही मिळते. म्हणूनच याचा उपयोग करून मी ही मदत जाहीर करत आहे. माझ्याबरोबर आयपीएल खेळत असलेल्या इतर खेळाडूंनीही आपापल्या परीने मदतीचा हात द्यावा, अशी सूचना कमिन्सने केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या