"रोहितनं RCB ला एवढ्या ट्रॉफ्या जिंकून दिल्या असत्या का?"
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवत संघाला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून दिले. फायनल सामन्यात रोहित शर्माने 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळीही केली होती. या जेतेपदासह मुंबई इंडियन्सने 13 पैकी 5 हंगामात चॅम्पियन होण्याचा पराक्रम करुन एक नवा किर्तीमान प्रस्थापित केला आहे.
जर आयपीएलच्या हंगामातील यशस्वी कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्स ऐवजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचे नेतत्व करत असता तर त्याने बंगळुरुच्या संघालाही मुंबईप्रमाणे ट्रॉफ्या जिंकून दिल्या असत्या का? असा प्रश्न माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी भारताचे माजी सलामीवीर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांना केलाय. रोहितच्या नेतत्वाखाली मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवल्यानंतर गौतम गंभीरने कोहलीला कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आकाश चोप्रा यांनी कोहलीची बाजू घेत या प्रकरणात उडी मारली आहे.
आकाश चोप्रा यांनी फेसबुकच्या माध्यमातून गौतम गंभीर यांनी उपस्थितीत केलेल्या मुद्यावरुन प्रश्नार्थक बाउन्सरचा मारा केलाय. रोहित शर्माला भारतीय टी20 संघाचे कर्णधार न करणे हे देशाचे दुर्भाग्य आहे, असे गंभीर यांनी म्हटले होते. यावर आकाश चोप्रा यांनी म्हटलंय की, रोहित शर्मा बंगळुरुचा कर्णधार असता तर त्याला या संघाला इतक्या ट्रॉफ्या मिळवून देणं शक्य झाले असते का? रोहित शर्मा कर्णधार म्हणून उत्तम आहे. पण मुंबई इंडियन्सच्या यशाची तुलना राष्ट्रीय संघासोबत करणं कितपत योग्य वाटते? कोहलीचा संघ चांगली कामगिरी करत नसेल तर ती त्याची चुक नाही, असे ठाम मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे.