आयपीएल खेळाडूंच्या परतण्याची व्यवस्था करू - ब्रिजेश पटेल

पीटीआय
Wednesday, 5 May 2021

आयपीएल आता स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या देशात परत जाण्यासाठी आम्ही मार्ग काढू, असे मत आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली - आयपीएल आता स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या देशात परत जाण्यासाठी आम्ही मार्ग काढू, असे मत आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केले आहे.

सर्व परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात परत जाण्याची व्यवस्था करणे आमची जबाबदारी आहे, ती आम्ही पूर्ण करू, असे पटेल म्हणाले. तीन खेळाडू परत गेल्यानंतर १४ ऑस्ट्रेलिया, १० न्यूझीलंड, ११ इंग्लंड आणि द. आफ्रिका तसेच नऊ व वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे प्रत्येकी दोन खेळाडू खेळत होते.

आयपीएल स्थगित करण्यात आली असली, तरी परदेशी खेळाडूंची काळजी बीसीसीआयकडून व्यवस्थितपणे घेतली जाईल, असा विश्वास न्यूझीलंड क्रिकेट संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. आमचे खेळाडू सुरक्षित आहेत आणि ज्या संघात कोरोनाबाधित खेळाडू होते ते अलगीकरणात आहेत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असेही न्यूझीलंड क्रिकेट संघटनेने म्हटले आहे. आयपीएल संपल्यानंतर भारत आणि न्यूझीलंडचे कसोटी संघातील काही खेळाडू एकत्रितपणे इंग्लंडला कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळण्यासाठी एकत्रितपणे लंडनला रवाना होणार आहे.

भारताबरोबरची प्रवासबंदी
१) ऑस्ट्रेलिया - १५ मेपर्यंत बंदी
२ ) न्यूझीलंड - न्यूझीलंड नागरिकांनाच प्रवेश; मात्र १४ दिवसांचे विलगीकरण
३) दक्षिण आफ्रिका - कोणतेही निर्बंध नाहीत
४) बांगलादेश - विमान प्रवास बंदी; मात्र रस्ता मार्ग खुला, परंतु १४ दिवसांचे विलगीकरण
५) अमिराती - भारतातून कोणत्याही विमान प्रवासास बंदी (त्यामुळे दुबईमार्गे जाण्याचाही मार्ग बंद)


​ ​

संबंधित बातम्या