IPL 2021 : स्मिथला बाहेरचा रस्ता, 'रॉयल' संजू राजस्थानचा 'कॅप्टन'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

2012 च्या हंगामात झालेल्या आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता. पण त्याला खेळण्याची संधीच मिळाली नव्हती.

IPL Franchisees Retained And Released Players : आयपीएलच्या लिलावापूर्वी संजू सॅमसनला मोठं गिफ्ट मिळाले आहे. स्टिव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्सने रिलीज केले असून त्याच्या जागी संघाच्या कर्णधारपदाची धूरा  संजू सॅमसनकडे देण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी स्पर्धेतील फ्रेंचायजींना खेळाडूंना रिलीज आणि रिटेनची यादी द्यायची होती. फ्रंचायजींनी ही प्रक्रिया सुरु केली आहे. सातत्यापूर्ण कामगिरीचं फळ संजू सॅमसनला अखेर मिळाले आहे. 

संजू सॅमसनने 2013 पासून आयपीएलच्या युएईत रंगलेल्या 13 व्या हंगामापर्यंत एकूण 107 सामने खेळले आहेत. त्याच्या नावे एकूण 2584 धावा असून यात 2 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. युएईत काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या स्पर्धेत त्याने 14 सामन्यात 3 अर्धशतकाच्या मदतीने 375 धावा केल्या होत्या. 85 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. 

 IPL 2021 : मुंबई इंडियन्सनं यॉर्कर किंग मलिंगाला केलं रिलीज

2012 च्या हंगामात झालेल्या आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता. पण त्याला खेळण्याची संधीच मिळाली नव्हती. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. यष्टिरक्षक म्हणून संघात घेतलेल्या संजूला दुसऱ्याच मॅचमध्ये बॅटिंगमध्ये प्रमोशन दिले. यावेळी त्याने 41 चेंडूत 61 धावांची खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. 2014 च्या हंगामात राजस्थानने त्याला पुन्हा रिटेन केल. 2016 च्या आयपीएल हंगामात दिल्ली डेयरडेव्हियल्सने त्याच्यासाठी 4.2 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात सामील केले. (राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी होती)  2018 ला राजस्थानने 8 कोटी मोजून त्याला पुन्हा आपल्या संघात घेतले होते.


​ ​

संबंधित बातम्या