क्रिकेटच्या मैदानातील वर्ल्ड रेकॉर्ड; जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 4 April 2021

यापूर्वी सातत्यपूर्ण वनडे सामने जिंकण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन पुरुष संघाच्या नावे होता. त्यांनी सलग 21 वनडे सामने जिंकले होते.  

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंडच्या महिला संघाला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह तीन सामन्याच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने नुसती  1-0 अशी आघाडी घेतली नाही तर एक खास विक्रम आपल्या नावे केला. सातत्यपूर्ण  22 वनडे सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलिय महिला संघाच्या नावे झाला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पुरुष क्रिकेट संघाला क्रिकेटच्या मैदानात जे जमले नाही ते ऑस्ट्रेलियन महिला संघाने करुन दाखवले. यापूर्वी सातत्यपूर्ण वनडे सामने जिंकण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन पुरुष संघाच्या नावे होता. त्यांनी सलग 21 वनडे सामने जिंकले होते.  

पहिल्या वनडे सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाने 48.5 षटकात न्यूझीलंडचा डाव 212 धावांत आटोपला.  सलामीची फलंदाज  लॉरेन डाउन हिने 90 धावांची खेळी केली. तर कर्णधार एमी सॅटर्थवेट हिने 32 आणि एमेलिया कॅरने 33 धावांची उयुक्त खेळी केली. ऑस्ट्रेलियाक़ून  मेघन स्कूटने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर निकोला कॅरीने तिघींना तंबूचा रस्ता दाखवला. 

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

213 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर अवघ्या 23 धावा असताना रशेल हेयनेसच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर विकेट किपर एलिस पेरी आणि एशलेग गार्डनर यांनी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. या दोघींच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिलांनी 39 व्या षटकात टार्गेट पार केले. 


​ ​

संबंधित बातम्या