बीसीसीआयने फेटाळला होता अमिरातीमधील प्रस्ताव

पीटीआय
Wednesday, 5 May 2021

आयपीएल एका आठवड्यावर असताना लीग भारताऐवजी अमिरातीत घेण्याची सूचना आयपीएल प्रशासकीय समितीने केली होती, पण भारतीय मंडळाच्या कार्यकारिणीने हा प्रस्ताव फेटाळला होता असे समजते.

चेन्नई - आयपीएल एका आठवड्यावर असताना लीग भारताऐवजी अमिरातीत घेण्याची सूचना आयपीएल प्रशासकीय समितीने केली होती, पण भारतीय मंडळाच्या कार्यकारिणीने हा प्रस्ताव फेटाळला होता असे समजते.

भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे संकेत मार्चच्या अखेरीस मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याच सुमारास ब्रिजेश पटेल अध्यक्ष असलेल्या समितीने कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढल्यास आयपीएल संयोजनात अडचणी येतील, त्यामुळे स्पर्धा अमिरातीत घेण्याची सूचना केली होती.

आयपीएल प्रशासकीय समितीच नव्हे, तर चार फ्रँचाईजनी लीग पुन्हा अमिरातीत घेण्याचे सुचवले होते; मात्र भारतीय मंडळ लीग भारतात घेण्यास आग्रही होते. २०२० च्या लीगमुळे जास्त आर्थिक फायदा अमिरातीचा झाला, असा त्या वेळी विचार करण्यात आला होता.


​ ​

संबंधित बातम्या