बीसीसीआयला सुमारे २२०० कोटींचा फटका?

पीटीआय
Wednesday, 5 May 2021

यंदाची आयपीएल मध्यावरच स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - यंदाची आयपीएल मध्यावरच स्थगित करावी लागल्यामुळे बीसीसीआयला दोन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

३० मेपर्यंत पूर्ण होणारी आयपीएल मध्यावर स्थगित करावी लागली. साधारणतः दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात म्हणजेच २२०० कोटींचे नुकसान आम्हाला होऊ शकते, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

५२ दिवसांच्या स्पर्धेत एकूण ६० सामने होणार होते. त्यापैकी २४ दिवसांचा खेळ झाला आणि २९ सामने शक्य झाले. 

आयपीएलला सर्वाधिक रक्कम ब्रॉडकास्ट स्टार सोर्टस् आणि प्रायोजक विवो कंपनी आणि असोसिएट प्रायोजक यांच्या कडून मिळते.

प्रायोजक विवोबरोबरचा करार

  • प्रत्येक मोसमासाठी ४४० कोटींचा करार
  • स्पर्धा अर्धी झाल्यामुळे २२० कोटीच मिळू शकतील 
  • सहयोगी प्रायोजकांबरोबर १२० कोटींचा करार
  • ही सर्व रक्कम अर्धी केली, तर सुमारे २२०० कोटींचा तोटा होऊ शकेल. 

कसा आहे करार?

  • स्टार स्पोर्टस् पाच वर्षांसाठी १६,३४७ कोटींचा करार
  • त्यानुसार वर्षासाठी ३,२६९.४ कोटी
  • प्रत्येक सामन्यासाठी ५४.५ कोटी
  • शक्य झालेल्या २९ सामन्याचे १,५८० कोटी
  • त्यानुसार १,६९० कोटींचा बीसीसीआयला फटका

​ ​

संबंधित बातम्या