CSK vs RR : धोनीपुढे युवा संजू सॅमसनची परीक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

IPL 2021 : धोनी-सॅमसनपुढे विजयी अभियान कायम ठेवण्याचे लक्ष्य

IPL 2021, मुंबई - एकेक विजय मिळवून गुणांचे खाते उघडणाऱ्या चेन्नई आणि राजस्थान यांच्यात उद्या लढत होत आहे. पंजाबविरुद्ध मिळवलेला एकतर्फी विजय चेन्नई संघासाठी आत्मविश्वास उंचावणारा आहे. राजस्थानला मात्र अनेक छिद्रे बुजवावी लागणार आहेत. सलामीच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर चेन्नईने कमालीची उंचावणारी कामगिरी केली. वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सहाय्य करणारी मिळाल्यावर दीपक चहरने कहर केला आणि त्याच्यासमोर पंजाबच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे चेन्नईचा विजय सोपा झाला होता. 

फाफ डुप्लेसी आणि मोईन यांना या फलंदाजांना सापडलेला सूरही चेन्नईसाठी महत्त्वाचा ठरला असला, तरी ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांना संधीचा फायदा घेता आला नव्हता.  दुसरीकडे राजस्थानने दिल्लीविरुद्ध विजय मिळवला असला, तरी त्यात दिल्ली कर्णधार रिषभ पंतने केलेल्या चुका राजस्थानच्या पथ्यावर पडल्या होत्या. उद्या त्यांच्यासमोर क्रिकेटविश्वातील कसलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. त्यामुळे राजस्थानला सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

आधी जोफ्रा आर्चर आणि त्यानंतर बेन स्टोक्स यांच्या अनुपस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या राजस्थानची फलंदाजीतील मदार जॉस बटलरवर आहे; परंतु त्याला अजून अपेक्षित योगदान देता आलेले नाही. उद्या त्याच्यासमोर फॉर्मात असलेल्या दीपक चहरचे आव्हान असेल. डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांनी अगोदरच्या सामन्यात केलेल्या अर्धशतकी खेळी राजस्थानच्या फलंदाजीतील ताकद वाढवणारी आहे.

प्रतिस्पर्धी संघ -
 

  • चेन्नई सुपर किंग्स :

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), सुरेश रैना, नारायण जगदीशन, आर. गायकवाड, केएम आसिफ, करण शर्मा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, फाफ डू प्लेसिस, शार्दुल ठाकुर, मिशेल सेंटनर, ड्वेन ब्रावो, लुंगी एंगिडी, सॅम करन, रविंद्र जडेजा, इमरान ताहिर, रॉबिन उथप्पा, मोइन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, एम. हरिशंकर रेड्डी, के. भगत वर्मा, सी. हरी निशांत, आर. साई किशोर आणि जेसन बेहेंड्रोफ

  • राजस्थान रॉयल्स :

संजू सॅमसन  (कर्णधार आणि विकेटकीपर), जोस बटलर (विकेटकीपर), रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, एंड्रूय टाय, जयदेव उनादकत, मयंक मारकंडे, यशस्वी जायस्वाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा, रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, क्रिस मोरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, लियाम लिविंग्स्टोन, कुलदीप यादव आणि आकाश सिंह


​ ​

संबंधित बातम्या