CSKvsRR : फोटोंच्या खजिन्यातून; सामन्यातील खास क्षण एका क्लिकवर
CSK & RR यांच्यातील सामन्यात काही अप्रतिम क्षण पाहायला मिळाले. स्मिथनं केलेला पॅडल स्विप, सॅम कुरेननं केलेला बाउन्सरचा सामना आणि धोनीनं यष्टीमागे अप्रतिम झेल टिपत आयपीएलमध्ये 150 झेल पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. अशाच काही खास क्षणांचा फोटोच्या माध्यमातून घेतलेला मागोवा...
Chennai vs Rajasthan, 37th Match अबुधाबीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 5 गड्यांच्या मोबदल्यात 125 एवढ्या माफक धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानने सामना 7 गडी आणि 15 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात जोस बटलरने धमाकेदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले.
CSK & RR यांच्यातील सामन्यात काही अप्रतिम क्षण पाहायला मिळाले. स्मिथनं केलेला पॅडल स्विप, सॅम कुरेननं केलेला बाउन्सरचा सामना आणि धोनीनं यष्टीमागे अप्रतिम झेल टिपत आयपीएलमध्ये 150 झेल पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. अशाच काही खास क्षणांचा फोटोच्या माध्यमातून घेतलेला मागोवा...
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ एक अप्रतिम पॅडल स्विप करताना त्याने या सामन्यात 34 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली.
शेख झायद स्टेडियमवर जोस बटलर नावाचे वादळ घोंगावताना पाहायला मिळाले. आघाडी कोलमडल्यानंतर मैदानात उतरलेल्या बटलरने 48 चेंडूत 70 धावांची मॅच विनिंग खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 2 षटकार खेचले.
चेन्नईच्या डावाची सुरुवात करणाऱ्या सॅम कुरेन एका बाउंन्सरचा सामना करताना
संजू सॅमसनचा झेल घेत महेंद्रसिंह धोनीने 200 व्या सामन्यात आयपीएलमध्ये यष्टिमागे 150 झेल घेण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
सामन्यानंतर नियमावलीचे पालन करत एकमेकांच्या खेळाला सन्मान देताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि महेंद्रसिंह धोनी