IPL मध्ये CSK कडून खेळणाऱ्या पुजाराने टी-20 त ठोकलय शतक; व्हिडिओ व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 22 February 2021

कदाचित तुम्हाला माहित नसेल पण टी-20 मध्ये शतकी खेळी साकरण्याचा पराक्रमही त्याने करुन दाखवलाय. 

भारतीय संघातील कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा याची पुन्हा एकदा आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने त्याला 50 लाख रुपये मोजून आपल्या संघात सामील केले. पुजाराने ज्यावेळी  20 लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये आयपीएलच्या मिनी लिलावात नाव नोंदणी केली तेव्हा अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात त्याला कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला असेल. पण तो झटपट क्रिकेटमध्येही कमालीचा फलंदाज आहे, हे त्याने यापूर्वीच सिद्धही केलेय. कदाचित तुम्हाला माहित नसेल पण टी-20 मध्ये शतकी खेळी साकरण्याचा पराक्रमही त्याने करुन दाखवलाय. 

Vijay Hazare Trophy 2021 : मुंबईची ‘शॉ’नदार विजयी सलामी

पुजाराने 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत शतकी खेळी केली होती. आयपीएलमध्ये चेन्नईने त्याला आपल्या ताफ्यात घेतल्यानंतर आता त्या शतकी खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुजाराने 2014 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसला होता. यावेळी त्याने 25 च्या सरासरीनं आणि 100 च्या स्ट्राईक रेटनं 6 सामन्यात 125 धावा केल्या होत्या. आतापर्यंत त्याच्या आयपीएल कामगिरीवर नजर टाकली तर  30 सामन्यात 20 च्या सरासरीने आणि 100 पेक्षा कमी स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या आहेत. 30 सामन्यात त्याच्या नावे एकमात्र अर्धशतक आहे.  

Vijay Hazare Trophy 2021 : महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराजची शतकी चमक

चेन्नईच्या संघाने मिनी आयपीएलमध्ये अनुभवी खेळाडूंवर पुन्हा एकदा भर दिल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी राजस्थान संघातील रॉबिन उथप्पा याला त्यांनी आपल्या संघात समावून घेतले होते. त्यानंतर पुजारासारख्या कसोटीची शिक्का बसलेल्या खेळाडूंना त्यांनी संघात स्थान दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईकडून पुजाराला किती सामन्यात संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या