चिनी कंपनी VIVO कडेच राहणार IPL 2021 ची टायटल स्पॉन्सरशीप

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

VIVO आणि BCCI यांच्यात  प्रति वर्ष 440 कोटी रुपयांचा करार झाला आहे.

चिनी मोबाईल कंपनी VIVO यंदाच्या IPL 2021 हंगामात पुन्हा एकदा स्पॉन्सरशीपच्या रुपात एन्ट्री करताना दिसणार आहे. अन्य कोणत्याही कंपनीकडून टायटल स्पॉन्सरशिपसाठी योग्य बोली लागली नसल्यामुळे पुन्हा एकदा  चिनी VIVO कंपनीची एन्ट्री होणार आहे. भारतातील लोकप्रिय आयपीएल स्पर्धेतील स्पॉन्सरशीपसाठी VIVO आणि BCCI यांच्यात  प्रति वर्ष 440 कोटी रुपयांचा करार झाला आहे. पूर्व  लडाख परिसरात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर मागील हंगामात VIVO स्पॉन्सरशीपला स्थगित देण्यात आली होती.  

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "ड्रीम 11 आणि अनअ‍ॅकॅडमीने या वर्षीच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी VIVO कडे जो प्रस्ताव ठेवला तो त्यांना मान्य नव्हता. त्यामुळं आगामी आयपीएल टायटल स्पॉन्सरशीप दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतर करणे शक्य झालेले नाही. यंदाच्या हंगाा  VIVO ने  यंदाच्या वर्षी स्वत: स्पॉन्सरशीप घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीसाठी नवा स्पॉन्सर शोधला जाईल" 

गेल्या 5 वर्षांत मोदी जिनपिंग यांना 18 वेळा भेटले; तरीही भारत-चीन संबंधात तणाव 

ड्रीम 11 आयपीएल 2020 चा ‘टायटल’ स्पॉन्सर होते. 222 कोटी रुपयांसह त्यांनी अधिकार मिळवले होते. VIVO पाच वर्षांच्या करारात जितकी रक्कम देणार आहे त्याच्यापेक्षा ही रक्कम निम्म्यापेक्षा कमी होती. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार,  VIVO ने 2018 ते 2022 पर्यंत आयपीएल स्पॉन्सरशिप अधिकार मिळवण्यासाठी 2190 कोटींचा करार केला आहे.

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना या दिग्गज क्रिकेटर्संनी वाहिली श्रद्धांजली

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रंगणार स्पर्धा 

आयपीएलच्या 14 हंगामातील स्पर्धा ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून रंगणार आहे. बीसीसीआयने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. स्पर्धा भारतामध्ये होणार हे निश्चित असले तरी ठिकाणे कोणती असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने  अहमदाबाद, पुणे आणि मुंबई या तीन शहरात खेळवण्यात येतील, अशीही चर्चा सुरु आहे. 


​ ​

संबंधित बातम्या