मॉरिसवरील 'रॉयल' बोली 'बॉस'पेक्षा मदतनीसाला जादा पगार मिळाल्यासारखी

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

संगकारा यांनी आयपीएलच्या लिलावात क्रिस मॉरिससाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यानंतर कोणती जबाबदारी असणार आहे, त्याची माहिती दिली आहे.

आयपीएलच्या मिनी लिलावात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिस मॉरिसला मोठी बोली लागली. राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपये मोजून त्याला 'रॉयल' केले. आतापर्यंतच्या 13 हंगामातील आयपीएल लिलिवात एखाद्या खेळाडूला लागलेली ही सर्वोच्च बोली ठरली. यापूर्वी युवराज सिंगसाठी 2015 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटी रुपये मोजले होते. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मोठे बदल करण्याचे संकेत दिले होते. स्मिथला रिलीज करुन त्यांनी संजू सॅमसनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदाली दिली. याशिवाय क्रिकेट ऑफ डायरेक्टर म्हणून श्रीलंकेच्या कुमार संगकारा यांची नियुक्ती केली होती. 

IPL Auction 2021 : अनसोल्ड राहिल्यावर गर्लफ्रेंडनं केलं ट्रोल; ICCने केली मध्यस्थी

संगकारा यांनी आयपीएलच्या लिलावात क्रिस मॉरिससाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यानंतर कोणती जबाबदारी असणार आहे, त्याची माहिती दिली आहे. मॉरिस हा  राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या जोफ्रा आर्चरला सहाय्यक अर्थातच मदतनीस म्हणून जबाबादीर पार पाडताना दिसणार आहे. संगकारा यांनी ऑनलाईन चर्चेवेळी मॉरिसच्या निवडीवर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या-ज्या वेळी तो (मॉरिस) फिट असतो तेव्हा त्याचा संघाला फायदा होतो. राजस्थान रॉयल्स गोलंदाजीमध्ये या दोघांचा शिफाफीनं वापर करताना पाहायला मिळेल, असेच संकेत संगकारा यांनी दिले. 

INDvsENG : विराटनंही केलाय डिप्रेशनचा सामना; एकटेपणाचा अनुभव खूप वाईट होता

जोफ्रा मुख्य धूरा सांभाळणार आणि मॉरिस डबल कमावणार 

2018 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात जोफ्रा आर्चरला 7.20 कोटी रुपये मोजून राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतले होते. या हंगामात इंग्लिश क्रिकेटरने 10 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. 2019 च्या हंगामात त्याने 11 मॅचेसमध्ये 11 तर युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलमध्ये त्याने सर्वच्या सर्व 14 सामन्यात 20 बळी टिपले होते. तो प्रमुख गोलंदाज असताना मदतनीस म्हणून घेतलेल्या मॉरिस याला 'बॉस' पेक्षा मदतनीसाला अधिक भाव मिळाला, असेच काहीतरी समीकरण दिसते. त्याच नाणं खणखणीत ठरणार का? ये येणाऱ्या हंगामातील त्याची कामगिरीच ठरवेल. पण तूर्तास तरी त्याला आवाक्यापेक्षा अधिक पैसा मिळालाय हे मात्र नक्की. अष्टपैलू हा त्याच्यातील जोफ्रापेक्षा अधिक आहे. पण संगकारांनी त्याला सहाय्यक गोलंदाज असल्याचे म्हटल्यानंतर त्याला जरा अधिकच पगार मिळाल्यासारखेच आहे.


​ ​

संबंधित बातम्या