धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 April 2021

चेन्नईनं २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं

IPL 2021 : एम.एस. धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आयपएलमधील आघाडीच्या संघापैकी एक आहे. चेन्नईनं २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं आहे. गतवर्षी सातव्या क्रमांकावर राहणाऱ्या चेन्नईनं यंदा पुन्हा चषकावर नोक कोरण्याची तयारी सुरु केली आहे. २०२० मध्ये युएईत झालेल्या स्पर्धेत धोनीच्या चेन्नईला प्लेऑफमध्येही जागा पटकावता आली नाही. धोनीचा संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक ८ वेळा अंतिम सामना खेळला आहे. यंदा चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिल रोजी दिल्लीविरोधात आहे.  पाहूयात आयपीएलमधील चेन्नई संघाचे काही रंजक विक्रम...  

59.83 : सामना जिंकण्याच्या टक्केवारीत चेन्नईचा संघ सर्वात यशस्वी आहे. चेन्नईनं १७९ सामन्यापैकी १०६ मध्ये विजय मिळवला. चेन्नईच्या विजयाची टक्केवारी 59.83 इतकी आहे. तर पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबईच्या विजयाची टक्केवारी 59.11 इतकी आहे. 

188 : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत १८८ सामन्यात नेतृत्व केलं आहे. यंदाच्या हंगामात कर्मधार म्हणून धोनी २०० सामने पूर्ण करेल. याशिवाय धोनी ९ वेळा आयपीएल फायनल खेळला आहे.  

200 सामने : चेन्नईचा स्टार खेळाडू सुरेश रैना (193 सामने) आणि यंदा या संघाचा भाग झालेला  रॉबिन उथप्पा (189) यंदाच्या  हंगामात आपले २०० सामने पूर्ण करतील. 

148 जणांना बाद : महेंद्र सिंह धोनीने आतापर्यंत यष्टीच्या मागे १४८ जणांना बाद केलं आहे. यादरम्यान धोनीनं १०९ झेल घेतले आहेत. सर्वाधिक झेल घेण्याचा कार्तिकचा (११०) विक्रम धोनी मोडीत काढेल. तसेच आयपीएलमध्ये यष्टीमागे १५० जणांना बाद करणारा धोनी पहिला यष्टीरक्षकही होईल.

9000 धावा : सुरेश रैनानं टी20 क्रिकेटच्या 308 डावांत 8494 धावा चोपल्या आहेत. रोहित शर्मा (9065) आणि विराट कोहली (9731) नंतहर टी-२० रैना ९ हजार धावांचा पल्ला पार करेल. आयपीएलध्ये रैनानं189 डावांत 5368 धावा केल्या आहेत. यंदा सुरेश रैना आयपीएलमध्ये २०० षटकारांचा विक्रमही आपल्या नावावर करेल. त्याशिवाय ५०० चौकारांचाही विक्रम करेल. रैनानं आतापर्यंत आपीएलमध्ये 493 चौके ठोकलेत.  

50 विकेट : चेन्नई सुपर किंग्स संघातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर यंदा आपले ५० बळींचा टप्पा पार करतील. शार्दुलनं आतापर्यंत ४६ तर चहरनं ४५ विकेट घेतल्यात.  


​ ​

संबंधित बातम्या