IPL च्या तयारीसाठी धोनीच्या CSK ची मुंबईला पसंती; जाणून घ्या प्लॅन

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

चेन्नई सुपर किंग्जने निवेदनानुसार, चेन्नईचा संघ एक महिना मुंबईत वास्तव्य करणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली तीन वेळा चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ आगामी हंगामासाठी सज्ज झालाय. 9 एप्रिलपासून रंगणाऱ्या स्पर्धेसाठी चेन्नईचा संघ मुंबईत सराव करणार असल्याचे वृत्त आहे. चेन्नईच्या संघाने 8 मार्चपासून एम ए चिदंबरम स्टेडियमवर सराव सुरु केला होता. त्यानंतर  आता मुंबईत दाखल झाली आहे. याच ठिकाणी ते आता प्रॅक्टिस करतील.  

चेन्नई सुपर किंग्जने निवेदनानुसार, चेन्नईचा संघ एक महिना मुंबईत वास्तव्य करणार आहे. CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील दोन आठवड्याचे सराव शिबीर संघासाठी फायदेशीर ठरले. चार ते पाच दिवस नेट प्रॅक्टिसही करता आल्याचे समाधानही खेळाडूंनी व्यक्त केले आहे.   

9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज हंगामातील पहिले पाच सामने मुंबईच्या मैदानात खेळणार आहे. त्यांची पहिली लढत 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होईल. 16, 19, 21 आणि 25 एप्रिल रोजी चेन्नईसमोर अनुक्रमे पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाचे आव्हान असेल. चेन्नई संघाचे साखळी फेरीतील उर्वरित सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाताच्या मैदानात रंगतील.  

INDvsENG: कोरोना टेस्टनंतर रोहितनं पंतला अशी दिली रिअ‍ॅक्शन (VIDEO)

चेन्नई सुपर  किंग्ज (CSK) -संघ
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, सी हरी निशांत, चेतेश्वर पुजारा, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डू प्लेसिस, हरिशंकर रेड्डी, इमरान ताहिर, जोश हेजलवुड, के भगत वर्मा, के गौतम, कर्ण शर्मा, केएम आसिफ, लुंगी नगडी, मिशेल सँटनर, मोईन अली, नारायण जगदीशन, आर साई किशोर, रवींद्र जडेजा, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, सॅम कुरेन, शार्दुल ठाकुर, सुरेश रैना.


​ ​

संबंधित बातम्या