IPL 2021 : CSK मध्ये एन्ट्री करताच पुजाराने केली षटकारांची बरसात (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 31 March 2021

. कसोटी स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या पुजाराला लिलावात भाव मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर चेन्नई सुपर किंग्जने दिलेल होते.

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरु केली आहे. मुंबईच्या मैदानातील नेट प्रॅक्टिसमध्ये लक्षवेधी ठरतोय तो म्हणजे कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराचा सिक्सर. आयपीएलच्या लिलावात 50 लाख रुपये मोजून चेन्नई सुपर किंग्जने पुजाराला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. कसोटी स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या पुजाराला लिलावात भाव मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर चेन्नई सुपर किंग्जने दिले. त्यानंतर आता या फलंदाजाने टी-20 मध्ये उत्तुंग फटकेबाजी करण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.  

मंगळवारी चेन्नईच्या संघाने कसून सराव केला. यावेळी चेतेश्वर पुजाराने थेट स्टॅडमध्ये चेंडू टोलवल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणे अभिमानाची गोष्ट असल्याचे पुजारा मानतो. आंतरराष्ट्रीय सामन्यातील पदार्पण हे धोनीच्या नेतृत्वाखाली केले होते. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळणे भावनात्मक असल्याचे पुजाराने म्हटले आहे.  

 

कॅप्टन्सीची नो वॅकन्सी; स्मिथच्या 'बोलंदाजी'नंतर कोचची फटकेबाजी

पुजाराची ओळख कसोटीपटू अशी असली तरी टी-20 मध्येही त्याने आपल्यातील क्षमता दाखवली आहे. पुजाराने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 64 T20 सामने खेळले आहेत. यात 110 च्या स्ट्राईक रेटने 1356 धावा केल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये पुजाराच्या नावे एक शतकही जमा आहे.  IPL मध्ये तो 30 मॅच खेळला असून 390 धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याच्या कामगिरीमुळे सीएसकेने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. चेन्नई सुपर किंग्ज त्याचा वापर कशापद्धतीने करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. संधी मिळाल्यानंतर फटकेबाजी करण्यासाठी तयार आहे, हेच तो प्रॅक्टिस सेशनमध्ये दाखवून देत आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या