CSK चा जुना फोटो व्हायरल होण्यामागचे कारण माहितेय?

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 19 April 2021

एका नेटकऱ्याने त्यावेळच्या आठवणीला उजाळा देणाऱ्या क्षणचित्रांचा एक फोटो कोलेज करुन शेअर केलाय

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच CSK चा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत माइक हसीसह सामन्यातील काही क्षण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागे एक खास कारण आहे. 2008 मध्ये आजच्याच दिवशी चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या हंगामातील पहिला सामना खेळला होता. पंजाब विरुद्धच्या सामना 33 धावांनी जिंकत त्यांनी ग्रँड ओपनिंग केले होते. 

एका नेटकऱ्याने त्यावेळच्या आठवणीला उजाळा देणाऱ्या क्षणचित्रांचा एक फोटो कोलेज करुन शेअर केलाय. हॅप्पी बर्थडे चेन्नई सुपर किंग्ज असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. पार्थिव पटेल आणि मॅथ्यू हेडिन या जोडीने चेन्नईच्या डावाची सुरुवात केली होती .चेन्नईकडून पहिली धाव घेण्याचा विक्रम त्याच्याच नावे आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या हेडिनने चेन्नईकडून पहिला षटकार आणि चौकार खेचला होता. मायकल हसीने याच सामन्यात नाबाद 116 धावांची खेळी केली होती. तो चेन्नईकडून शतकी खेळी करणारा पहिला फलंदाज आहे. गोनीच्या नावे पहिली विकेट तर पार्थिवच्या नावे पहिल्या कॅचची नोंद आहे. 

आयपीएलच्या पहिल्या हंगामातील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने ज्या दिमाखात विजय नोंदवला होता. त्याच तोऱ्यात राजस्थानला नमवून संघाने बर्थडे सेलिब्रेशन करावे, अशी चेन्नईच्या चाहत्यांची इच्छा असेल. पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या चेन्नईच्या डावाची सुरुवात म्हणावी तितकी चांगली झालेली नाही. तीन गडी शंभरच्या आत माघारी फिरले असून रैना आणि अंबाती रायडूवर मोठी मदार आहे.


​ ​

संबंधित बातम्या