अर्जुन मुंबई इंडियन्सचाच होणार; नेटकऱ्यांनी जर्सीचा नंबरही ठरवला

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

एका नेटकऱ्यांनी अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सचा संघ विकेत घेईल, असा तर्क लावला आहे. एवढेच नाही तर त्याने आयपीएल लिलावासंदर्भातील एक फोटो शेअर केलाय.

आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावासाठी नाव नोंदणी केलेल्या निम्म्याहून अधिक खेळाडूंचा पत्ता कट झाला आहे. यात श्रीसंतसारख्या चर्चित वेगवान गोलंदाजाचाही समावेश आहे. दुसरीकडे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला अंतिम 292 जणांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

यातून आता 61 खेळाडूंना फ्रँचायझी संघ खरेदी करतील. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकर ट्रोल होताना दिसत आहे. अनेकजण त्याला मुंबई इंडियन्सच खरेदी करणार असा अंदाज बांधत आहेत. 

May be an image of प्रशांत पगारे

एका नेटकऱ्याने अक्षय कुमारच्या चित्रपटातील डॉयलॉगसह एक फोटो शेअर करत श्रीसंतवर अन्याय झाला आणि अर्जुन तेंडुलकरला पसंती देण्यात आली, अशी भावना व्यक्त केली आहे.

No photo description available.

अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात घेण्यासंदर्भात मुकेश अंबानीच बोली लावतील, अशा आशयाची मिम्सही व्हायरल होताना दिसते. 

May be an image of 2 people and text that says 'Shaman @wittyshaman #arjuntendulkar #Mumbailndians #Ambani Nita Ambani when other franchise bids bids for Arjun Tendulkar Oye!! Wapas rakh use'

एखाद्या फ्रँचायझी संघाने अर्जुन तेंडुलकवर बोली लावली तर निता अंबानी रागात काय म्हणतील, याची मिम्स एका नेटकऱ्याने शेअर  केली आहे.

 

May be an image of 1 person

अर्जुन तेंडुलकरचं मिशेल स्टार्कसारख होईल, आयपीएलच्या लिलावात दिसेल पण खेळताना दिसणार नाही, असे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले आहे.

एका नेटकऱ्यांनी अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सचा संघ विकेत घेईल, असा तर्क लावला आहे. एवढेच नाही तर त्याने आयपीएल लिलावासंदर्भातील एक फोटो शेअर केलाय. यात एक महिला 01 क्रमांकाची जर्सी हातात धरुन उभी असल्याचे दिसते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 10 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरायचा. त्यामुळे त्याचा मुलगा आता 01 क्रमांकाची जर्सी घालून दिसेल, असा तर्कही या नेटकऱ्याने व्यक्त केलाय.
 


​ ​

संबंधित बातम्या