IPL 2021: रॉबिन पिवळ्या जर्सीत दाखवणार धमक; धोनीच्या CSK संघात झाली एन्ट्री

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 22 January 2021

आयपीएल 2021 च्या मिनी ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अनुभवी फलंदाजाचा फोटो शेअर केलाय.

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या मिनी ऑक्शन (IPL 2021 Auction) पूर्वी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) ला महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ला ट्रेंड केले आहे. स्टीव स्मिथ (Steve Smith) ला रिलीज केल्यानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे राजस्थानच्या खात्यात आणखी काही शिल्लक वाढलीय. मागील हंगामात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सची कामगिरी खराब झाली होती. आता त्यांनी कॅश डीलमध्ये तीनवेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नईला जॉईन होण्याचा निर्णय घेतलाय.  

देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजीने लक्षवेधून घेणाऱ्या उथप्पाला मागील हंगामात 3 कोटी रुपये मोजून राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात घेतले होते. राजस्थानमधून खेळण्यापूर्वी तो  मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुर, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाइट राइडर्सचा सदस्य देखील राहिला आहे.

IPL 2021 : ...म्हणून मुंबई इंडियन्सने मलिंगाला रिलीज केलं

आयपीएल 2021 च्या मिनी ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अनुभवी फलंदाजाचा फोटो शेअर केलाय. खेळाडू ट्रेडिंगसंदर्भात राजस्थान रॉयल्सकडूनही एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यांनी उथप्पाची प्रतिक्रिया सुद्धा आपल्या निवेदनातून दिली आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना खूप आनंदी वातावरण होते. आयुष्यातील एक चांगला अनुभव मिळाला. आगामी स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्यास खूप उत्सुक आहे, असे उथप्पाने म्हटले आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या