IPL 2021 : 14 व्या हंगामाचा कार्यक्रम ठरला! नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार फायनल

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 7 March 2021

आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने हे  अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाताय या शहरात निश्चित करण्यात आले आहेत.  

यंदाच्या हंगामात होणाऱ्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 9 एप्रिलपासून 14 व्या हंगामातील आयपीएलला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. पहिला सामना चेन्नईच्या मैदानात खेळवण्यात येईल. 30 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर फायनलची लढत नियोजित आहे. आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने हे  अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाताय या शहरात निश्चित करण्यात आले आहेत.  

स्पर्धेतील 56 सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरुच्या मैदानात 10 सामने रंगतील. अहमदाबाद आणि दिल्लीच्या मैदानात प्रत्येकी 8-8 सामने नियोजित आहेत. यंदाच्या हंगामात 11 डबल हेडर सामने खेळवण्यात येतील.

आयपीएलचे संपर्ण शेड्युलसाठी येथे क्लिक करा

 9 एप्रिल मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 7:30 PM चेन्नई 
 10 एप्रिल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स  7:30 PM मुंबई 
11 एप्रिल  सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स 7:30 PM चेन्नई 
12 एप्रिल राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज 7:30 PM मुंबई 
 13 एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स 7:30 PM चेन्नई 
14 एप्रिल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 7:30 PM चेन्नई 
15 एप्रिल राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 7:30 PM मुंबई 
 16 एप्रिल पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज 7:30 PM मुंबई 
17 एप्रिल मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्य हैदराबाद  7:30 PM चेन्नई 
 18 एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स 3:30 PM चेन्नई सुपर किंग्ज
18 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज 7:30 PM मुंबई 
19 एप्रिल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स  7:30 PM मुंबई 20 एप्रिल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स 7:30 PM चेन्नई  


​ ​

संबंधित बातम्या