IPL Auction 2021 : या तीन फलंदाजांवर लागू शकते मोठी बोली

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मागील हंगामात सपशेल अपयशी ठरला. पंजाबने मोठी रक्कम देऊन त्याला संघात घेतले होते. फ्लॉप शोनंतर त्याला रिलीज करण्याचा निर्णय पंजाबच्या संघाने घेतलाय.

आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी फ्रँचायझींनी संघ बांधणी मजबूत करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. फेब्रुवारी 2021 च्या आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी आपापल्या संघातील काही खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व फ्रँचायझींनी रिटेशनमध्ये 139 खेळाडूंना कायम राखले, तर 57 खेळाडूंना रिलीज करण्यात आले. काही संघांनी मोठ्या आणि दर्जेदार खेळाडूंनाही रिलीज केले. या खेळाडूंना आयपीएलच्या मिनी लिलावात मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळू शकते. 18 फेब्रुवारीला चेन्नईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. जाणून घेऊयात असे तीन खेळाडू ज्यांच्यासाठी संघ मालक अधिक पैसा लावायला तयार होतील. 

Image

ग्लेन मॅक्सवेल

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मागील हंगामात सपशेल अपयशी ठरला. पंजाबने मोठी रक्कम देऊन त्याला संघात घेतले होते. फ्लॉप शोनंतर त्याला रिलीज करण्याचा निर्णय पंजाबच्या संघाने घेतलाय. आयपीएलच्या मिनी लिलालामध्ये त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजण्यासाठी एखादा संघ सहज तयार होऊ शकतो. मोठ्या फटकेबाजीसह गोलंदाजीच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळेच त्याला चांगली किंमत मिळू शकते.  
Image
स्टीव स्मिथ

राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्टिव्ह स्मिथलाही रिलीज करण्यात आले आहे. भारता विरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने सलग दोन शतके लगावली होती. त्याच्यातील ही क्षमता जाणून त्यालाही एखादा संघ अधिक पैसा मोजून आपल्या ताफ्यात घेतले तर नवल वाटण्याचे कारण नाही. केकेआर आणि चेन्नईचा संघ स्मिथला आपल्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. 
Image
एरॉन फिंच
ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकातील कर्णधार एरॉन फिंचलाही बंगळुरुने रिलीज करण्याचा निर्णय़ घेतला. युएईच्या मैदानात झालेल्या स्पर्धेत फिंच आपल्या नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला होता. मिनी लिलावात त्याला आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा फ्रँचायझींमध्ये पाहायला मिळू शकते.  चेन्नई सुपरकिंग्स, केकेआर, पंजाब  हे संघ त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी मोठी रक्कम मोजायला तयार होऊ शकतात.  


​ ​

संबंधित बातम्या