भाऊ MI चं चॅलेंज; मग कोहलीला चैन कसा पडेल (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 29 March 2021

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेचा द एन्ड गोड केल्यानंतर कोहलीने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडला चारीमुंड्याचित केलं. पुण्याच्या मैदानात धाकधूक वाढलेल्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने इंग्लंडला दौऱ्यात व्हाईट वॉश केले. कसोटी, टी-20 आणि वनडेतील एकही मालिका इंग्लंडला जिंकता आली नाही. या मालिकेनंतर संघातील खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. पुढील दोन महिने खेळाडू लोकप्रिय स्पर्धेत व्यस्त असतील. किंग कोहली आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. टीम इंडियाला विजयी मिळवून दिल्यानंतर आता फ्रेंजायझी संघासाठी विराट कोहलीने कंबर कसली आहे.

होळीच्या दिवशीही तो वर्क आउट करताना पहायला मिळाले. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेचा द एन्ड गोड केल्यानंतर कोहलीने ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो ट्रेडमिलवर धावताना दिसते. विश्रांतीचा एकही दिवस माझ्याकडे नाही, या आशयाच्या कॅप्शनसह विराट कोहलीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने आयपीएल स्पर्धेचा हॅशटॅगही वापरल्याचे दिसते. स्पर्धेच्या सुरुवातीला विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर मुंबई इंडियन्सचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे त्याला चैन पडणार नाही, असेच म्हणावे लागेल. इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत कोहलीच्या भात्यातून सर्वाधिक धावा निघाल्या होत्या. त्याने या स्पर्धेत मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कारही मिळवला होता. तीन वनडे सामन्यात त्याने 129 धावा केल्या होत्या.  

धोनीसोबत लढवय्या सॅम कुरेनचा फोटो का होतोय व्हायरल?

सध्याच्या घडीला टीम कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दमदार कामगिरी करत आहे. मात्र आतापर्यंत आयपीएलमध्ये कोहलीला नेतृत्वाची विशेष छाप सोडता आलेली नाही. आयपीएलमध्ये विराट कोहलीची वैयक्तिक कामगिरीही चांगलीच आहे. पण नेतृत्वाथील अपेक्षित झलक त्याने अद्याप दाखवून दिलेली नाही. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएलमध्ये जर-तरच्या समीकरणातून रॉयल चॅलेंजर्सने कसेबसे प्ले ऑफचं तिकीट मिळवलं होते. यंदाच्या हंगामात पुन्हा त्याच्या संघासमोर दमदार कामगिरी करुन विशेष छाप सोडण्याचे चॅलेंज असेल. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याचा संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे रोमहर्षक असेल.  


​ ​

संबंधित बातम्या