वानखेडे स्टेडियममधील आणखी तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

IPL 2021 : आयपीएलचे सामने सुरू होण्यात काही दिवसच शिल्लक असले तरी कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेईना.

IPL 201 : मुंबई - वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलचे सामने सुरू होण्यात काही दिवसच शिल्लक असले तरी कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेईना. आणखी दोन ग्राऊंड स्टाफसह एका प्लंबरला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. या घटनेला मुंबई क्रिकेट संघटनेने दुजोरा दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या नव्या रुग्णांमुळे वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांबाबत चिंता वाढली आहे.

आणखी दोन ग्राऊंडसमन त्याचसोबत एक प्लंबर यांचा कोराना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. वानखेडे स्टेडियमच्या परिसरातच असलेल्या क्लब हाऊसमध्ये आम्ही अशा सर्व संबंधितांची राहण्याची व्यवस्था मुंबईतील सामने संपेपर्यंत केली आहे, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.गेल्या आठवड्यात १० ग्राऊंडसमन कोरोनाबाधित झाल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील सामने इतरत्र हलवण्याबाबतही बोलले जात होते, परंतु हे सामने मुंबईतच होतील असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कालच स्पष्ट केले.

IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

किरण मोरे कोरोनाबाधित
आयपीएल आता अवघ्या तीन दिवसांवर आलेली असताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. माजी यष्टिरक्षक आणि संघाच्या स्टाफमधील किरण मोरे यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. किरण मोरे हे मुंबई इंडिन्सचे यष्टिरक्षक प्रशिक्षक तसेच नवोदित गुणवत्ता शोध समितीचे सदस्य आहेत. मोरे यांची चाचणी पॉझिटिव्ह आली असली, तरी त्यांना सध्या कोणतीही लक्षणे नाहीत. मंबई इंडियन्स आणि बीसीसीआयने आखून दिलेले निर्देश पाळत आहे, असे मुंबई इंडियन्सने कळवले आहे. गेल्या महिन्यात मोरे यांनी कोरोनावरील लस घेतली होती. त्याचे छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मुंबई वि. बंगळूर यांच्यातील सामन्याने आयपीएलला सुरुवात होणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या