IPL 2021 : दिल्ली वर्सेस चेन्नई सामन्यापूर्वी टेन्शन; वानखेडेवरील 8 कर्मचाऱ्यांना कोरोना

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 3 April 2021

वानखेडेच्या मैदानातील ग्राउंड स्टाफ मेंबर्संना कोरोना झाल्याचे वृत्त आयोजकांची डोकेदुखी वाढवणारे असे आहे. 

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरुन चिंता वाढवणारी बातमी आलीय. वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील 8 कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी मोजक्या स्टेडियमवर सामने घेण्यात येणार आहेत. यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचाही समावेश आहे. राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असताना मुंबईच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यावर संकट ओढवणार का? अशी चर्चा सुरु असताना आता वानखेडेच्या मैदानातील ग्राउंड स्टाफ मेंबर्संना कोरोना झाल्याचे वृत्त आयोजकांची डोकेदुखी वाढवणारे असे आहे. 

10 एप्रिल रोजी वानखेडेच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईत चेन्नईच्या संघाने प्रॅक्टिस सुरु केल्याचे काही फोटोही यापूर्वी समोर आले होते. सर्वकाही ठिक सुरु असताना वानखेडेच्या मैदानातून आलेली बातमी आयोजकांचे टेन्शन वाढवणारी अशीच आहे.  मैदानात कार्यरत असलेले कर्मचारी हे लोकल ट्रेनने प्रवास करणारे आहेत. या प्रकारानंतर मुंबई क्रिकेट असोशिएसनने अन्य कर्मचाऱ्यांना देखील आता मैदानातच राहण्याची व्यवस्था केली आहे. एमसीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ग्राउंड स्टाफसाठी मैदानातच थांबवण्यासाठी अनेक रुम उपलब्ध आहेत. त्यामुळे या अधिक चिंता करण्याची गरज नाही. 

IPL 2021 : मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत चिंता

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी आयपीएलची स्पर्धा ही युएईत पार पडली होती. या स्पर्धेनंतर यंदाच्या हंगामातील स्पर्धा भारतातच घेण्यात येईल, असा निर्धार बीसीसीआयने केला होता. त्यानुसार देशातील मोजक्या शहारांची निवड करण्यात आली. मुंबईसह चेन्नई, बंगळुरु, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलकाताच्या मैदानात आयपीएलमधील सामने खेळवण्यात येणार आहेत. कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानात सामना खेळणार नाही. याशिवाय प्रेक्षकांना देखील सामन्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.  


​ ​

संबंधित बातम्या