IPL 2021 : रिटेन होताच 360 डिग्री एबी ठरला मालामाल होणारा पहिला परदेशी खेळाडू

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 22 January 2021

आयपीएलमधील 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा तो चौथा खेळाडू आहे. या

AB de Villiers 100 Cr Salary Club: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने (Royal Challengers Bangalore) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) च्या आगामी 14 हंगासाठी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सला 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले. संघाने करार कायम ठेवण्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एका खास क्लबमध्ये समावेश झालाय. आयपीएलमध्ये  (IPL) 100 कमाई करणारा तो परदेशातील पहिला खेळाडू ठरलाय. 

फेब्रुवारीमध्ये आगामी 2021 आयपीएल हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने 36 वर्षीय डिव्हिलिअर्सला 11 कोटींमध्ये रिटेन केले. आयपीएलमधील 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी, बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सला सर्वाधिकवेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा यांची कमाई 100 कोटींच्या घरात होती. धोनी 150 कोटींसह सर्वात आघाडीवर आहे.  

IPL 2021 : लिलावा आधी फ्रँचायझींची खेळी; जाणून घ्या रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्समध्ये मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच त्याला मिस्टर 360 डिग्री असेही संबोधले जाते. आयपीएलमध्ये त्याने 169 सामने खेळले असून 40.40 च्या सरासरीने त्याने 4, 849 धावा केल्या आहेत. 2008 च्या पहिल्या हंगामात एबी दिल्लीच्या ताफ्यातून मैदानात उतरला होता. त्यानंतर 2011 पासून तो बंगळुरुकडून खेळतो. बंगळुरुची मदारी ही विराट-एबी या जोडीवर अवलंबून असल्याचे आतापर्यंतच्या हंगामात दिसून आले आहे. 


​ ​

संबंधित बातम्या