क्रिकेट त्याच्या रक्तातच; खास कॅप्शनसह मुंबई इंडियन्सनं शेअर केला अर्जुन तेंडुलकरचा फोटो

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन यासंदर्भात ट्विट केले आहे. 

आगामी आयपीएल स्पर्धेसाठी (IPL2021) चेन्नईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. आयपीएलच्या लिलावाची तारीख ठरल्यापासून चर्चेत असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्या खरेदीनं लिलावाची सांगता झाली. मुंबई इंडियन्सने   21 वर्षीय अर्जुन तेंडुलकरला मूळ किंमतीत (20 लाख) खरेदी केले. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन यासंदर्भात ट्विट केले आहे. 

IPL Auction 2021 : अनेक दिग्गजांच्या पदरी निराशा; जाणून घ्या अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी

"I would like to thank the coaches, owners and the support staff for showing faith in me."

Arjun Tendulkar shares his thoughts on joining MI #OneFamily #MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/fEbF6Q1yUF

— Mumbai Indians (@mipaltan) February 18, 2021

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मुकेश अंबानी यांचे पूत्र आणि मुंबई इंडियन्सचे मालक अकाश अंबानी यांनी अर्जुन तेंडुकरच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केलाय. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही स्तरावर चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्यामुळेच त्याच्यावर बोली लावली, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुकरचा नेट प्रॅक्टिसमधील एक फोटो शेअर केलाय. क्रिकेट अर्जुनच्या रक्तातच आहे, या खास कॅप्शनसह मुंबई इंडियन्सने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन नव्या गड्याचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अकाश अंबानी यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. झहिर खान आणि महिला जयवर्धने यांनी देखील अर्जुनचे स्वागत केले असून तो चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केलाय. 

IPL 2021 Auction : मॅक्सवेलसाठी कोहलीच्या संघानं मोजली 'विराट' किंमत

Cricket in his blood. Refined in the nets. Now ready to take the 22-yards by storm

Welcome home, Arjun Tendulkar!#OneFamily #MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/jncjVF64Lh

— Mumbai Indians (@mipaltan) February 18, 2021

अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ देखील मुंबई इंडियन्सने शेअर केलाय. मुंबई पलटनमध्ये सहभागी झाल्याचा खूप आनंद वाटतो. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. मुंबई इंडियन्स माझ्यासाठी कुटुंबियाप्रमाणेच राहिली आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल अर्जुनने मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक आणि स्टाफ सदस्यांचे आभार मानले आहेत.  

विक्रमी पाच वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या मुंबईच्या ताफ्यात दिग्गज आणि प्रतिभावंत क्रिकेटर्सचा भरणा आहे. यात अर्जुन तेंडुकरचा समावेश झाला आहे. युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या संघासोबत नेट बॉलर म्हणून सोबत होता. मिनी लिलावापूर्वी त्याने मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील फोटो इन्टास्टोरीवरुन शेअर केला होता. यासर्व घटना तो मुंबई इंडियन्सचा सदस्य होणार याचे संकेत देणारा होता. हे संकेत आता खरे झाले असून किती सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या