क्रिकेट खेळत नसता तर, इसिसमध्ये असता; तस्लीमा नसरीनचं सीएसकेच्या खेळाडूविरोधात ट्वीट

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

नामवंत लेखिका तस्लीमा नसरीन यांनी चेन्नई सुपर किंग्जमधील अष्टपैलू खेळाडू विरोधात वादग्रस्त ट्विट केलं

IPL 2021 : नवी दिल्ली - नामवंत लेखिका तस्लीमा नसरीन यांनी चेन्नई सुपर किंग्जमधील अष्टपैलू खेळाडू मोईन अली याच्याविरोधात वादग्रस्त ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे तस्लीमा यांच्यावर चेन्नईच्या चाहत्यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर, तो सीरियात जाऊन इसिसमध्ये गेला असता, असे ट्विट तस्लीमा नसरीन यांनी केलं आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने चेन्नई सुपर किंग्जच्या आपल्या जर्सीवरील बिअर कंपनीचा लोगो काढण्याची सूचना केली, त्यावर समाज माध्यमात चर्चा सुरु होती. त्यास अनुसरुन बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका नसरीन यांनी हे ट्विट केले. जोरदार टीका झाल्यावर त्यांनी आपले हे ट्विट उपरोधिक होते, पण त्यातूनही वाद निर्माण करण्यात आला, असा दावा करण्यात आला. 

हेही वाचा ; माही भाईकडून शिकलो तेच त्याच्या विरुद्ध ट्राय करेन : पंत 

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी या दोन्ही ट्विटचा समाचार घेतला आहे. नसरीन यांनी हे ट्विट डिलीट करणेच योग्य होईल असे जोफ्रा आर्चरने म्हटले आहे. दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू यंदाच्या आयपीएल हंगामात धोनीच्या चेन्नई संघाकडून खेळणार आहे. १४ व्या आयपीएलपूर्वी झालेल्या लिलावात चेन्नईनं मोईन अलीला ७ कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. यापूर्वी मोईन अली विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा सदस्य होता.

वादग्रस्त ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तस्लीमा यांचा चांगलाच समाचार घेत टीका केली. तस्लीमा यांना आपल्या लिखानामुळे मुस्लीम समाजाकडून अनेकदा जीवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. या कारणामुळे तस्लीमा नसरीन यांना आपला देशही सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांना स्वीडनचं नागरिकत्व घ्यावं लागलं होतं.  

 


​ ​

संबंधित बातम्या