IPL 2021 : खेळाडूंना देणार कोरोना लस; BCCI आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 4 April 2021

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफ आणि संघातील खेळाडूंसह त्यांच्या संलग्नित असलेल्या व्यक्तिंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईतील स्पर्धेचे नियोजन बारगळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता.

देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफ आणि संघातील खेळाडूंसह त्यांच्या संलग्नित असलेल्या व्यक्तिंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईतील स्पर्धेचे नियोजन बारगळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. 

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

कोरोनाच्या काळात होत असलेल्या स्पर्धेसंदर्भात बीसीसीआय विशेष खबरदारी घेत आहे. 6 ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी बायोबबलचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. प्रोटोकॉल नुसार स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएल स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंना लस देण्यासंदर्भात बीसीसीआय आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.    
 


​ ​

संबंधित बातम्या