राहुल द्रविडमुळं टी-20 क्रिकेटसंदर्भातील भीती पळाली : पुजारा

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 5 April 2021

पुजाराने टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचे श्रेय राहुल द्रविड याला दिले आहे. टी-20 च्या रिंगणात पुन्हा उतरणे द्रविडच्या सल्ल्यामुळे सहज शक्य झाले, असे त्याने म्हटले आहे.

भारतीय संघाचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा सात वर्षानंतर टी-20 क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय. संयमी खेळीनं कसोटीचा ठपका लागलेल्या पुजारासमोर झटपट क्रिकेटमध्ये फटेकाबाजी करणे मोठी कसोटी असणार आहे. यासाठी तो कसून सराव करत असून त्याने टान्सही बदलल्याचे समोर आले. महेंद्रसिंह धोनीच्या  चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर विश्वास दाखवला असून 50 लाख रुपये मोजून त्यांनी पुजाराला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलय. 

पुजाराने टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याचे श्रेय राहुल द्रविड याला दिले आहे. टी-20 च्या रिंगणात पुन्हा उतरणे द्रविडच्या सल्ल्यामुळे सहज शक्य झाले, असे त्याने म्हटले आहे. पुजाराने ईएसपीएन क्रिकइन्फोला यासंदर्भात खास मुलाखत दिलीये. तो म्हणाला की, टी-20 क्रिकेट खेळण्यासंदर्भात मोठी चिंता वाटायची. झटपट क्रिकेटमध्ये खेळताना कसोटीतील कामगिरीवर परिणाम होईल, असा विचार करायचो. त्यामुळे टी-20 क्रिकेटपासून दूर राहणे पसंत केल. राहुल द्रविडने समजावल्यानंतर याकडे वळणे सोपे झाले.  

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

द्रविडच्या सल्ल्याने टी-20 ची मनातील भिती दूर झाली

टी-20 क्रिकेटनुसार स्वत:ला तयार केले तर कसोटीसाठी आवश्यक तंत्राचा विसर पडेल, अशी भावना मनात होती. पण आता तसा विचार करत नाही. ती भिती आता मनातून निघून गेली आहे. यासाठी द्रविडचा सल्ला कामी आला. तुझा स्वाभाविक खेळ कधीही बदलणार नाही. टी-20 मध्ये तू नवीन फटके खेळायला शिकता येईल, असा सल्ला राहुल द्रविडने दिल्याचे त्याने सांगितले. 

टी-20 मधून पुन्हा टेस्ट खेळण्यात अडचण येणार नाही

पुजारा म्हणाला की,  2005-06 मध्ये मी  फर्स्ट क्लास क्रिकेटला सुरुवात केली. या गोष्टीला आता 15 वर्षे झाली. त्यामुळे टी-20 खेळताना कसोटीतील तंत्र विसरणार नाही, याची खात्री आहे. टी20 मधून टेस्टमध्ये स्विच होताना कोणतीही अडचण येणार नाही. कसोटीतील उत्तम खेळाडू मर्यादित षटकात उत्तम खेलू शकतो, असे मतही पुजाराने यावेळी मांडले.  


​ ​

संबंधित बातम्या