यूनिवर्स बॉसचा षटकारांचा विक्रम; रोहित-धोनी आसपासही नाहीत

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 April 2021

IPL 2021 : मुंबई येथील वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात अनेक विक्रम झाले.

IPL 2021 : आयपीएलच्या चौथ्या सामन्यात पंजाबनं राजस्थानचा अवघ्या ४ धावांनी पराभव केला. मुंबई येथील वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात अनेक विक्रम झाले. सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाबच्या ४१ वर्षी ख्रिस गेल यानं आपल्या छोटेखानी खेळीत मोठा विक्रम नावावर केलाय. गेलनं नेहमीप्रमाणेच आपल्या छोटेखानी खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांची पिसे काढली. कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल या जोडीने सालाबादप्रमाणे पंजाब किंग्जच्या डावाची सुरुवात केली. मयंक चांगली फटकेबाजी करत असताना पदार्पण करणाऱ्या चेतन साकारियाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. मयंक माघारी फिरल्यानंतर स्फोटक गेल मैदानात आला. त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत राजस्थानच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. लोकेश राहुलच्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत त्याने पंजाबला सुस्थितीत आणले. 

हेही वाचा; IPL 2021 : पंजाबच्या राहुलनं मोडला वॅटसनचा विक्रम

राजस्थानसाठी डोकेदुखी ठरेल, अशी फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस गेल रियान परागच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. बेन स्टोक्सने सीमारेषेवर त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. गेलने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने 40 धावांची उपयुक्त खेली केली. तो अर्धशतक पूर्ण करुन पंजाबच्या संघाला आणखी मजबूत स्थितीत घेऊन जाईल, असे वाटत होते. पण गेलच्या वादळी खेळीला ब्रेक लावत परागने संघाला आवश्यक ती विकेट मिळवून दिली. गेल आणि लोकेश राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 67 धाावांची भागीदारी केली.  गेलनं आपल्या छोटेखानी खेळीत दोन षटकार लगावले. यासह गेलनं सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आयपीएलच्या इतिहासात ३५० षटकारांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू झाला. याआधी असा विक्रम कोणालाही करता आलेला नाही. आयपीएलमध्ये ३५० षटकार लगावणारा गेल पहिला खेळाडू ठरला आहे. 

IPL 2021 : ट्रक ड्रायव्हरच्या पोराची धमाकेदार एन्ट्री

आयपीएलमध्ये षटकारांच्या बाबातीत दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा डिव्हिलिअर्स याचा क्रमांक लागतो. डिव्हिलिअर्स यानं २३७ षटकार लगावले आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर चेन्नईचा कर्णधार एम. एस. धोनी विराजमान आहे. धोनीनं  २१६ षटकार चोपले आहेत.   

हेही वाचा ; दीपकचा षटकारांचा पाऊस, केला मोठा विक्रम

संजूचं शतक व्यर्थ, राजस्थानचा ४ धावांनी पराभव
वानखेडेच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर पंजाबाने बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने विक्रमी शतक केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना अर्शदीपच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. 222 धावांचे टार्गेट चेस करताना राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत मजल मारु शकला. यंदाच्या हंगामात नाव आणि नव्या जर्सीसह मैदानात उतरलेल्या पंजाबने 4 धावांनी सामना खिशात घातला. 
 


​ ​

संबंधित बातम्या